नवी दिल्ली : पाकिस्तानी कॅप्टन सरफराज अहमदला शुक्रवारी सकाळी उठल्यावर डोकेदुखीचा त्रास जाणवू लागल्याने हॉस्पीटलला नेण्यात आलं. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टदरम्यान त्याच्या हॅल्मेटवर बॉल आदळला होता. चौथ्या दिवशी तो विकेटकिपिंगसाठी मैदानावर उतरला नव्हता.
सरफराज अहमदच्या गैरहजेरीत मोहम्मद रिझवानने विकेटकिपिंगची जबाबदारी संभाळली. तर कमान अशदने टीमची कॅप्टनसी संभाळली.
गुरुवारी पाकिस्ताच्या दुसऱ्या डावात पीटर सिडलने टाकलेला बॉऊंसर सरफराजच्या हॅल्मेटवर आदळला. यावेळी सरफारज 32 रन्सवर खेळत होता.
कठीण परिस्थीततही त्याने बॅकआऊट न करता मैदानात उभं राहून खेळणंच पसंद केलं.
जेव्हा तो परतला ते्हा 123 बॉल्समध्ये त्याने 81 रन्स केले होते. त्यानंतर मॅचच्या चौथ्या डावात विकेट किपिंग करायलाही उतरला होता.
याआधी ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाला गुडघ्याचा त्रास होऊ लागला होता. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगितलं जातंय.
ख्वाजाच्या दुखापतीविषयी कित्येक खेळाडूंना माहित नव्हतं.
ख्वाजा तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात मैदानावर न दिसल्याने अनेकांना याबद्दल समजल्याचे ऑस्ट्रेलियन बॉलर पीटर सिडलने सांगितलं.