Michael Vaughan: वर्ल्डकप जिंकल्यानंतर माइकल वॉन यांचा टीम इंडियावर मोठा आरोप; म्हणाले, ICC ने मुद्दाम भारताला...!

Michael Vaughan Comment On India: मायकेल वॉन त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी दिलेल्या अनेक प्रतिक्रियांमुळे वाद झाल्याचं पहायला मिळालं. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 10, 2024, 06:35 PM IST
Michael Vaughan: वर्ल्डकप जिंकल्यानंतर माइकल वॉन यांचा टीम इंडियावर मोठा आरोप; म्हणाले, ICC ने मुद्दाम भारताला...! title=

Michael Vaughan Comment On India: २९ जून रोजी टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरलं. टी-२० वर्ल्डकपच्या संपूर्ण टूर्नामेंटमध्य रोहित शर्माच्य नेतृत्वाखाली टीम इंडियाने चांगली कामगिरी केली होती. यानंतर टीम इंडिया वर्ल्डकप घेऊन भारतात परतली. दरम्यान टीम इंडियाची ही उत्तम कामगिरी अनेक माजी क्रिकेटपटूंना आवडलेली नाही. यापैकी एक नाव आहे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांचं. मायकेल वॉन यांनी वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियावर मोठा आरोप केला आहे.

मायकेल वॉन त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी दिलेल्या अनेक प्रतिक्रियांमुळे वाद झाल्याचं पहायला मिळालं. असंच आता पुन्हा एकदा टीम इंडियावर केलेल्या आरोपांमुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

ICC ने टीम इंडियाची बाजू घेतली

इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी नुकतंच एका पॉडकास्टमध्ये भाग घेतला होता. यावेळी ते YouTube पॉडकास्ट क्लब प्रेरी फायरमध्ये सहभागी झाले होते. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत यांनीही या पॉडकास्टमध्ये भाग घेतला आहे.

या पॉडकास्टवर मायकेल वॉनसोबत ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट देखील उपस्थित होता. यावेळी इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यापूर्वीच्या या पॉडकास्टमध्ये मायकेल वॉनने आयसीसीवर आरोप करत म्हटलं की, 'आयसीसीने हा वर्ल्डकप भारतासाठी ठेवला आहे आणि भारताला जाणूनबुजून फेवर केलं आहे ' 

ॲडम गिलख्रिस्टकडूनही समर्थन

दरम्यान मायकेल वॉन यांनी हा मोठा आरोप केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे ॲडम गिलख्रिस्टनेही आपल्या मुद्याचे समर्थन करत म्हटले की, 'आयसीसीने भारताला विशेषाधिकार देऊ नये कारण तिथून जास्त पैसा येतो.' 

सेमीफायनल जिंकल्यानंतरही केली होती टीका

वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंजियाने इंग्लंडचा दारुण पराभव केला होता.यावेळीही मायकल वॉनने पुन्हा एकदा टीम इंडियावर निशाणा साधला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना गयानामध्ये झाला. उपांत्य फेरीच्या ठिकाणाबाबत मायकेल वॉन म्हणाला की, हे ठिकाण टीम इंडियाला फायदेशीर होते. इंग्लंडच्या टीमने उपांत्य फेरी दुसऱ्या मैदानावर  खेळली असती तर कदाचित त्या ठिकाणी जिंकली असती.