अजिंक्य रहाणेच्या फॅनने एका सेल्फीसाठी उचलला हा धोका

फॅन्स आपल्या आवडत्या क्रिकेटरला भेटण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात.सचिन तेंडुलकरला तर त्याच्या चाहत्यांनी देवाचा दर्जा दिलाय. यंदाच्या आयपीएलमध्येही क्रिकेटर्सप्रती त्यांच्या चाहत्यांचे प्रेम पाहायला मिळतेय. चेन्नईचा कर्णधार धोनीच्या पाया पडण्यासाठी त्याचा एक चाहता सुरक्षाकडे भेदून आला. या घटनेनंतर अशीच एक घटना समोर आलीये. मंगळवारी राजस्थान आणि पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. सामन्यात राजस्थानची गोलंदाजी सुरु होती. राजस्थानचे गोलंदाज पंजाबवर दबाव टाकून होते. 

Updated: May 9, 2018, 05:29 PM IST
अजिंक्य रहाणेच्या फॅनने एका सेल्फीसाठी उचलला हा धोका title=

मुंबई : फॅन्स आपल्या आवडत्या क्रिकेटरला भेटण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात.सचिन तेंडुलकरला तर त्याच्या चाहत्यांनी देवाचा दर्जा दिलाय. यंदाच्या आयपीएलमध्येही क्रिकेटर्सप्रती त्यांच्या चाहत्यांचे प्रेम पाहायला मिळतेय. चेन्नईचा कर्णधार धोनीच्या पाया पडण्यासाठी त्याचा एक चाहता सुरक्षाकडे भेदून आला. या घटनेनंतर अशीच एक घटना समोर आलीये. मंगळवारी राजस्थान आणि पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. सामन्यात राजस्थानची गोलंदाजी सुरु होती. राजस्थानचे गोलंदाज पंजाबवर दबाव टाकून होते. 

shook hand with Rahane

१९वे षटक सुरु होते आणि पंजाबला १२ चेंडूत विजयासाठी ४८ धावा हव्या होत्या. जोफ्रा आर्चरने १९व्या ओव्हरमधील पहिल्या तीन चेंडूत केवळ चार धावा केल्या. आर्चर चौथा चेंडू टाकणार इतक्यात अजिंक्य रहाणेचा एक फॅन डीप एक्स्ट्रा कव्हरजवळी बाऊंड्रीच्या दिशेने मैदानात आला आणि अजिंक्य रहाणेसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. 

fan was escorted out of the ground

त्यानंतर त्याने अजिंक्य रहाणेशी हात मिळवला तेव्हा सुरक्षारक्षकांनी त्याला पकडले. रहाणनेही त्या फॅनला निराश केले नाही. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला मैदानाबाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र तोपर्यंत त्या फॅनने रहाणेसोबत सेल्फी घेतला होता. या घटनेचा राजस्थानच्या खेळाडूंवर कोणताही परिणाम झाला नाही. 

Fans are treated afterwards