किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटाची ऑस्करसाठी अधिकृत एंट्री झाल्यापासून आमिर पुन्हा सक्रिय झाला आहे. सध्या तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून ऑस्कर मोहिमेसाठी प्रयत्न करत आहे. याच निमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्याने ऑस्कर जिंकण्याच्या महत्त्वाबद्दल सांगितले आणि त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट महाभारताविषयीही मनमोकळेपणाने बोलले.
'महाभारत' बनवण्याची भीती का वाटते?
आमिर खानने एका मुलाखतीत बोलताना 'महाभारत' हा त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले. पण हा प्रोजेक्ट करण्यासाठी भीती वाटते असे देखील सांगितले आहे. पुढे त्यानी स्पष्ट केले. 'महाभारत' हे खूप मोठे आणि जबाबदारीचे काम आहे. मला भीती वाटते की ते बनवताना माझ्याकडून काही चूक होऊ शकते. 'महाभारत' भारतीयांसाठी अत्यंत जवळची गोष्ट आहे, जी आपल्याच्या संस्कृतीत, रक्तात आहे. त्यामुळे ते अगदी योग्य पद्धतीने साकारायचे आहे. मला असे काही निर्माण करायचे आहे, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. भारताकडे काय आहे, हे मला जगाला दाखवायचे आहे.'
आमिरने असेही म्हटले की, 'हा प्रोजेक्ट कधी पूर्ण होईल, हे निश्चित सांगता येत नाही, पण एक दिवस मी त्यावर काम करण्यास सुरुवात करीन.'
ऑस्करबद्दल आमिरची मतं
ऑस्कर पुरस्काराबद्दल बोलताना आमिरने सांगितले की, 'लापता लेडीज' जर भारतासाठी ऑस्कर जिंकला, तर भारतीय प्रचंड आनंदी होतील. त्याने म्हटले, 'जेव्हा एखादा चित्रपट ऑस्कर जिंकतो, तेव्हा जगभरात त्याच्याकडे लक्ष वेधले जाते आणि त्याला अधिक प्रेक्षक मिळतात. भारतातही असेच होईल.'
जेव्हा आमिरला विचारले की 'लापता लेडीज' ऑस्कर जिंकल्यास लोकांची प्रतिक्रिया काय असेल, तेव्हा तो म्हणाला, 'भारतीय लोक ऑस्करसाठी फार उत्सुक असतात. जर आम्ही जिंकलो, तर संपूर्ण देशात जल्लोष सुरू होईल. लोक आनंदाने वेडे होतील. जर मी माझ्या देशासाठी हा पुरस्कार जिंकू शकलो, तर त्याहून मोठा आनंद मला होणार नाही.'
आमिरच्या आगामी चित्रपटांविषयी
आमिर सध्या त्याच्या आगामी 'तारे जमीन पर 2' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले असून तो 2025 च्या उन्हाळ्यात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, आमिरने रजनीकांतच्या 'कुली' या चित्रपटात एक महत्त्वाचा कॅमिओ केल्याच्या चर्चा देखील आहेत.
महाभारतप्रमाणेच, त्याच्या प्रोजेक्ट्समधील बांधिलकी आणि परिपूर्णतेमुळे आमिर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.