खेळाडूंना मिळतंय निकृष्ट दर्जाचं जेवण, क्रिकेटपटूकडून पोलखोल

निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याच्या या फोटोनं क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

Updated: Mar 5, 2021, 03:40 PM IST
खेळाडूंना मिळतंय निकृष्ट दर्जाचं जेवण, क्रिकेटपटूकडून पोलखोल title=

मुंबई: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन पाकिस्तान सुपर लीग सीजन-6 सध्या स्थगित करण्यात आली आहे. याच दरम्यान एका क्रिकेटपटूनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली. या पोस्टमुळे क्रिकेटविश्वातच नाही तर व्यवस्थापनातही मोठी खऴबऴ उडाली. तर पाकिस्तान सुपर लीगचं व्यवस्थापन पाहण्याऱ्यांची झोप उडाली.

अ‍ॅलेक्स हेल्सने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पीएसएल दरम्यान देण्यात आलेल्या नाश्त्याचे फोटो शेअर केले. ज्यामध्ये 2 अंडी आणि एक ब्रेड दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे उकडलेलं अंड सडलेलं दिसत आहे. या फोटोनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कारभाराचा पर्दाफाश झाला आणि मोठा खळबळ उडाली.

इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज अॅलेक्स हेल्स यावेळी पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद यूनायटेडकडून खेळत आहे.  2020 मध्ये तो कराची किंग्सकडून खेळला होता. त्यांना देण्यात येणारा नाश्ता  अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचं त्यानं आपल्या इन्स्टा स्टोरीमधून सांगितलं आहे. त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे मोठी खळबळ माजली तर क्रिकेटपटूनं संताप व्यक्त केला.