IPL 2022 मध्ये या खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस, सर्वच संघ लावणार जोरदार बोली

पुढील वर्षापासून लोकांना आयपीएलमध्ये 10 संघ खेळताना दिसणार आहेत.

Updated: Nov 9, 2021, 06:26 PM IST
IPL 2022 मध्ये या खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस, सर्वच संघ लावणार जोरदार बोली title=

मुंबई : ICC T20 world cup 2021 संपल्यानंतर लगेचच IPL 2022 मेगा लिलावाबद्दल चाहते उत्सुक आहेत. आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे, कारण देशातील आणि जगातील सर्व प्रसिद्ध क्रिकेटपटू यामध्ये खेळतात. पुढील वर्षापासून लोकांना आयपीएलमध्ये 10 संघ खेळताना दिसणार आहेत. त्यामुळे मेगा लिलाव (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. T20 विश्वचषकात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर सर्व फ्रँचायझींच्या मालकांची नजर असेल. त्या खेळाडूंवर मोठी बोली लावली जाऊ शकते.

जोस बटलर

इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) आपल्या शानदार खेळाच्या जोरावर टी-20 विश्वचषकात धावांचा धडाका लावला आहे. बटलर आपल्या बॅटने वादळ निर्माण करत आहे. ओपनिंग करताना तो काही षटकांत सामन्याचा मार्ग बदलतो. बटलर लांब षटकार मारण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. बटलरने आत्तापर्यंत T20 विश्वचषकात 240 धावा केल्या आहेत, ज्यात श्रीलंकेविरुद्ध 67 चेंडूत झंझावाती शतकाचा समावेश आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 32 चेंडूत 71 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत या खेळाडूवरून संघांमध्ये जोरदार युद्ध रंगणार आहे.

केएल राहुल

मेगा लिलावात सर्वोत्कृष्ट सलामीवीर फलंदाज केएल राहुलवर (KL Rahul) सर्व संघांच्या नजरा असतील. राहुल कोणत्याही संघासाठी फायदेशीर ठरू शकतो, जो कर्णधारासोबत फलंदाजीही करू शकतो. T20 विश्वचषकात राहुलने नामिबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध उत्कृष्ट खेळी केली आहे. राहुल जेव्हा फॉर्मात असतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजाच्या बॉलवर चांगले शॉट्स खेळू शकतो. पंजाब किंग्स (Punjab Kings) पुढील वर्षी केएल राहुलला वगळू शकतात. अशा परिस्थितीत त्याला खरेदी करण्यासाठी सर्व संघ मोठी किंमत मोजू शकतात.

रॅसी वॅन डर डुसेन

आयपीएल 2022 (IPL 2022) मेगा ऑक्शनमध्ये या खेळाडूवर मोठी बोली लागू शकते. तो आहे दक्षिण आफ्रिकेचा रॅसी वॅन डर डुसेन (Rassie van der Dussen). दक्षिण आफ्रिकेला उपांत्य फेरीच्या शर्यतीत पोहोचता आले नसले तरी डयुसेनने आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत, डुसेनने आपल्या आक्रमक फलंदाजीने गोलंदाजांचा धुव्वा उडवला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) रॉसी व्हॅन डर डयुसेनने (Rassie van der Dussen) अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही. टी-20 क्रिकेटमध्ये त्याचा मोठा विक्रम आहे. त्याने सर्व T20 टूर्नामेंटमध्ये 140 सामने खेळले आहेत आणि 4129 धावा केल्या आहेत ज्यात 3 शानदार शतकांचा समावेश आहे. हा खतरनाक फलंदाज विकत घेण्यासाठी चांगली स्पर्धा दिसणार आहे. लखनौ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ आहेत जे त्याला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सूक असतील. त्यांना एका फलंदाजाची गरज आहे जो त्यांना झटपट सुरुवात करून देऊ शकेल.