फीफा: बच्चन पिता-पुत्रांनी स्टेडियममधून लूटली फुटबॉल सेमीफायनलची मजा

अभिषेक बच्चन हे फुटबॉलचे शौकीन आहेत. त्यातच ते चेलसी क्लबचे कट्टर समर्थक असलेले अभिषेक इंडियन सुपर लीग फुटबॉलमध्ये चेन्नइयिन एफसी टीमचे मालकही आहेत. 

Updated: Jul 11, 2018, 02:54 PM IST
फीफा: बच्चन पिता-पुत्रांनी स्टेडियममधून लूटली फुटबॉल सेमीफायनलची मजा

सेंट पीटसबर्ग: बीग बी अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन हे दोघेही फुटबॉलचे चांगलेच फॅन आहेत. त्यामुळेच त्यांनी फुटबॉल वर्ल्डकप (फिफा) दरम्यान फ्रान्स आणि बेल्जियम यांच्यातील सेमीफाइनल सामन्याची मजा थेट स्टेडियममध्ये जाऊन लुटली.

अभिषेक बच्चन फुटबॉलचे शौकीन

बच्चन परिवार सध्या रशियामध्ये सुट्टी साजरी करत आहे. अभिषेक बच्चन हे फुटबॉलचे शौकीन आहेत. त्यातच ते चेलसी क्लबचे कट्टर समर्थक असलेले अभिषेक इंडियन सुपर लीग फुटबॉलमध्ये चेन्नइयिन एफसी टीमचे मालकही आहेत. 

सोशल मीडियावर पोस्ट

फीफा वर्ल्डकप सेमीफायनल सुरू होण्यापूर्वी अभिषेकने इंस्टाग्रामवर सामन्याच्या तिकीटाचा फोटोही काढला. तसेच, त्यांनी सामन्यादरम्यान, सेंट पीटसबर्ग स्टेडियमध्ये आपले वडील बिग बी बच्चन यांच्यासोबत एक सेल्फीही काढला. हा सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी फ्रान्सला शुभेच्छाही दिल्या.