पेजे सेलेन्सकी: फिल्ड हॉकीमधून निवृत्त होऊनही चर्चेत असणारी खेळाडू

स्कूलमध्येच तिला हॉकीचा नाद लागला. पुढे लवकरच ती स्कूलच्य हॉकी संघात सहभागी झाली.

Updated: Jul 11, 2018, 02:21 PM IST
पेजे सेलेन्सकी: फिल्ड हॉकीमधून निवृत्त होऊनही चर्चेत असणारी खेळाडू title=

नवी दिल्ली: यूएसकडून तब्बल १२५ सामने खेळलेली हॉकीपटू पेजे सेलेन्सकी निवृत्तीनंतरही चर्चेत आहे. २८ वर्षीय पेजेने गेल्याच वर्षी हॉकीमधून निवृत्ती घेतली होती. पण, त्यानंतरही ती ग्लॅमरवर्ल्डमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मैदानाबाहेर आल्यावरही तिच्या लोकप्रियतेत आणि तिच्याबद्धलच्या चर्चा तसूभरही कमी झाल्या नाहीत. काही दिवसांपूर्वीच पेजेने आपल्या मित्रासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. हे फोटो प्रचंड व्हायरल झाले. हे फोटो पाहून लोकांनी प्रतिक्रिया दिली की, तू फील्ड हॉकीच्या सर्वात सुंदर खेळाडूंपैकी एक आहेस.

पेजेने न्यूड फोटोशूटही केले होते

पेजे आपली दोस्त जॉनला डेट करत आहे. आपल्या डेटींगची माहिती तिने इंस्टाग्रामवर ऑफिशिअली सांगितली होती. पेजेने पोस्टमध्ये म्हटले होते की, अखेर आम्ही डेट करत आहोत. पेजेने ईएसपीएनच्या बॉडी इश्यूसाठी न्यूड फोटोशूटही केले होते. 

PunjabKesari

वयाच्या १०व्या वर्षापासून हॉकी खेळास सुरूवात

अमेरिकन गेम्सचे गोल्डपदक जिंकले तेव्हा पेजे पहिल्यांदा चर्चेत आली. २०१२मध्ये ऑलिंम्पिक दरम्यान पहिल्याच सामन्यात गोल करून ती एकाच रात्रीत प्रसारमाध्यमांतून बातम्यांचा विषय ठरली. युनिवर्सिटी ऑफ वर्जिनियाची विद्यार्थिनी राहिलेल्या पेजेला तिची आईने हॉकी खेळण्यासाठी लोकल हायस्कूलमध्ये घातले होते. तेव्हा ती केवळ १० वर्षांची होती.

PunjabKesari

२००९मध्ये मिळाली मोठी संधी

स्कूलमध्येच तिला हॉकीचा नाद लागला. पुढे लवकरच ती स्कूलच्य हॉकी संघात सहभागी झाली. त्यानंतर यूनिवर्सिटी ऑफ वर्जिनियाकडून खेळताना तिने प्रचंड नाव कमावले. २००९मध्ये तिला यूएस संघातून खेळण्याची संधी पहिल्यांदा मिळाली.