विम्बल्डन : सेरेनाला पराभवाचा धक्का, जर्मनीची अँजेलिक अजिंक्य

 सेरेना विलियम्सला महिला एकेरी अंतिम लढतीत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने पराभवाचा जोरदार धक्का दिला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 14, 2018, 11:15 PM IST
विम्बल्डन : सेरेनाला पराभवाचा धक्का, जर्मनीची अँजेलिक अजिंक्य title=
छाया - @Wimbledon ट्विटर वॉल

लंडन : वैयक्तिक आठव्या विम्बल्डन जेतेपदासाठी उत्सुक असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विलियम्सला महिला एकेरी अंतिम लढतीत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने पराभवाचा जोरदार धक्का दिला. कर्बरने फायनलमध्ये सेरेनाचा ६-३ ,६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. अँजेलिक प्रथमच विम्बल्डन पदक पटकावलेय.

अँजेलिक कर्बरचे कारकिर्दीतील हे पहिलेच विम्बल्डन जेतेपद आहे. स्टेफी ग्राफनंतर विम्बल्डन 'किताब पटकावणारी कर्बर ही पहिली जर्मन टेनिसपटू ठरली आहे. ग्राफने १९९६ मध्ये आपले शेवटचे विम्बल्डन जेतेपद पटकावले होते. आजच्या पराभवाने सेरेना मात्र आपल्या विक्रमी २४ व्या ग्रँडस्लॅम टेनिस अजिंक्यपदापासून दूर राहिली.

सेरेनाने आपल्या चिमुकल्या मुलीपासून दूर राहून ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. जिद्दीने खेळ करत सेरेनाने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. पण, तिच्या नशिबात जेतेपदाचा चषक नव्हता हेच या पराभवातून दिसून आले. जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने  ६-३ ,६-३ अशा फरकाने अवघ्या १ तास ५ मिनिटांत सुपरमॉम सेरेनाचा खेळ संपुष्टात आणला.