भारत-इंग्लंड सामना सुरु असताना स्टेडियममध्येच त्यानं गर्लफ्रेंडला केलं प्रपोज

एक तरुण आपल्या मैत्रिणीसोबत ही मॅच बघण्यासाठी आला होता.

Updated: Jul 14, 2018, 10:17 PM IST
भारत-इंग्लंड सामना सुरु असताना स्टेडियममध्येच त्यानं गर्लफ्रेंडला केलं प्रपोज title=

लंडन: क्रिकेटविश्वातील अनेक विक्रमांचा आणि इतिहासाचा साक्षीदार असलेल्या लॉर्डसच्या मैदानात शनिवारी चित्रपटात शोभेल असा प्रसंग घडला. आज याठिकाणी भारत-इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. यावेळी प्रेक्षक सामना बघण्यात मग्न असताना एक सुखद प्रसंग घडला. एक तरुण आपल्या मैत्रिणीसोबत ही मॅच बघण्यासाठी आला होता. त्याने अचानकपणे भर स्टेडियममध्ये मैत्रिणीला प्रपोज केले. स्टेडियममधील प्रेक्षक व खेळाडू या प्रसंगाचे साक्षीदार ठरले. 

हा तरुण मैत्रिणीला प्रपोज करायला जागेवरुन उठला तेव्हाच कॅमेऱ्याची नजर या दोघांकडे वळाली. समालोचकांनाही या परिस्थितीचा अंदाज आला आणि त्यांनी उत्स्फुर्तपणे मॅच सोडून या प्रसंगाचे समालोचन करायला सुरुवात केली. तरुणाने आपल्या खिशातून अंगठी काढून मुलीसमोर धरली. तेव्हा सर्वांनाच थर्ड अंपायरच्या निर्णयाप्रमाणे आता पुढे काय होणार, याची उत्सुकता लागली होती. अखेर मुलीने तरुणाला होकार दिल्यानंतर मैदानात एकच जल्लोष झाला. हा संपूर्ण प्रसंग मैदानातील मोठ्या स्क्रीनवर दाखवला जात होता.