कोहली-कुंबळे वादावर बोलले अनुराग ठाकुर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबले यांच्यातील वादावर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआयचा माजी 'बॉस' अनुराग ठाकुरने वक्तव्य केलं आहे. अनुराग ठाकुर म्हणतात की, टीम ही कर्णधारची असते म्हणून खऱ्या अर्थाने हा संघाचा बॉस तोच असला पाहिजे.

Updated: Jun 26, 2017, 05:30 PM IST
कोहली-कुंबळे वादावर बोलले अनुराग ठाकुर title=

मीरपूर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबले यांच्यातील वादावर भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआयचा माजी 'बॉस' अनुराग ठाकुरने वक्तव्य केलं आहे. अनुराग ठाकुर म्हणतात की, टीम ही कर्णधारची असते म्हणून खऱ्या अर्थाने हा संघाचा बॉस तोच असला पाहिजे.

अनुराग ठाकुर यांनी म्हटलं की, 'विराटवर बिनाकारण दबाव का बनवला जात आहे.? विराटला या सर्व गोष्टींवर लक्ष्य करणं योग्य नाही. कारण हे पहिल्यांदा नाही झालं आहे. याआधी ग्रेग चॅपलला देखील काढलं आहे. प्रत्येक वेळी कर्णधार खूपच महत्वाचा असतो, निवड समितीत देखील कारण अखेरीस टीम त्यालाच खेळवायची आहे. जर तुम्हाला पुढच्या १० वर्षात क्रिकेट एका वेगळ्या पातळीवर किंवा पुढे न्यायचा असेल तर तर तुम्हाला विराट सारखा दूत हवा.'

अनुराग पुढे म्हणतात की, "जोपर्यंत मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो तोपर्यंत असा कोणताही विवाद नाही झाला. आज जे लोकं बसले आहेत त्यांना याबाबत विचारपूस केली पाहिजे. त्यांना प्रश्न विचारले पाहिजे की या गोष्टी बाहेर कशा येतात.'