चिकू नाही तर अनुष्का विराटला प्रेमाने ही हाक मारते...

विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज अनुष्का शर्माने स्वीकारले आहे.

Updated: May 25, 2018, 12:48 PM IST
चिकू नाही तर अनुष्का विराटला प्रेमाने ही हाक मारते... title=

मुंबई : विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज अनुष्का शर्माने स्वीकारले आहे. अनुष्काने फिटनेससंबंधित एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात व्हिडिओतून एका खास गोष्टीचा उलघडा झाला आहे. अनुष्का विराटला प्रेमाने काय हाक मारते, हे यातून कळते. 

विराटने यांना दिले चॅलेंज

खरंतर विराट कोहलीने एक व्हिडिओ शेअर करत अनुष्का शर्मा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धोनीला चॅलेंज केले. व्हिडिओ शेअर करत विराटने लिहिले की, मी राज्यवर्धन सरांचे फिटनेस चॅलेंज स्वीकारतो. आता मला असे वाटते की, माझी पत्नी अनुष्का शर्मा, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धोनी भाई यांनी याचा स्वीकार करावा.

अनुष्का प्रेमाने म्हणते...

व्हिडिओत अनुष्का म्हणते, हे बेब्स, तू दिलेले चॅलेंज मी स्वीकारते. आता मी माझ्या आवडीचे वर्कआऊट दाखवत आहे. तु ही याचा प्रयत्न करशील.

पालकत्वावर विराट म्हणतो...

अलिकडेच विराट कोहलीने एका मुलाखतीत पालकत्वावर मोकळेपणाने आपले विचार मांडले. विराट म्हणतो की, मलाही माझे खाजगी आयुष्य आहे. कुटुंब आहे. माझीही मुले असतील. त्यांना माझ्यासोबत वेळ घालवण्याचा हक्क असेल. म्हणून एक गोष्ट माझ्या डोक्यात स्पष्ट आहे. माझी अशी इच्छा आहे की, माझ्या सर्व ट्रॉफीज, अचीवमेंट्स काहीही माझ्या घरात नसाव्यात. माझी मुले मोठी होताना त्यांना हे एका सेलिब्रेटीचे घर आहे, याची जाणीव मला होऊ द्यायची नाहीये.

दोघेही कामात व्यस्त

विराट आणि अनुष्का ११ डिसेंबर २०१७ मध्ये इटलीत विवाहबद्ध झाले. विरुष्काच्या या लोकप्रिय जोडीचा चाहता वर्गही मोठा आहे. लग्न, हनीमूननंतर आता दोघेही आपआपल्या कामात व्यस्त आहेत.