VIDEO : विराट कोहलीचा हात पकडून अनुष्काने असा केला रोमांस !!

श्रीलंकेनंतर होणाऱ्या टी - २० च्या सिरीजमध्ये कॅप्टन विराट कोहलीला आता आराम देण्यात आला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 5, 2017, 01:33 PM IST
VIDEO : विराट कोहलीचा हात पकडून अनुष्काने असा केला रोमांस !!  title=

मुंबई : श्रीलंकेनंतर होणाऱ्या टी - २० च्या सिरीजमध्ये कॅप्टन विराट कोहलीला आता आराम देण्यात आला आहे. 

आता वनडे प्रमाणेच टी -२० चा कॅप्टन टीम इंडियाचा रोहित शर्मा असणार आहे. विराट कोहलीला मिळालेल्या आरामाच्या बातमीनंतर विराट आणि अनुष्काच्या लग्नांच्या चर्चांना उधाण आलंय. थोडं आराम घेत असल्याचं समजताच डिसेंबरमध्ये कोहलीचं लग्न असल्याची चर्चा दबक्या आवाजात व्हायला सुरूवात झाली. 

मात्र दोघांनीही या लग्नाच्या बातमीला विरोध केल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र त्या दोघांमध्ये असलेलं प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध होतं आहे. हे दोघे लव बर्ड्स एका स्पोर्ट्स फंक्शनमध्ये नुसतेच पाहायला मिळाले. या इव्हेंटमधील एक फोटो विराटने आपला प्रोफाईल फोटो ठेवला आहे. विराटने तब्बल १ वर्षानंतर हा फोटो बदलला आहे. या अगोदर त्याचा जो फोटो होतो तो युवीच्या लग्नातला होता. 

विराट आणि अनुष्काचा Candid Moment कॅमेऱ्यात कैद 

मुंबईमध्ये इंडियन स्पोर्टस ऑनर्स अवॉर्डसमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटी पोहोचले होते. मात्र यामध्ये सगळ्यांचं लक्ष हे कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माकडे खिळल्या होत्या. 

जशी त्या दोघांनी रेड कार्पेटवर एन्ट्री केली. अगदी सगळ्यांच्या निजरा तेथेच खिळल्या. दोघं एकमेकांसोबत अगदी खूष आणि सुंदर दिसत होते. या कार्यक्रमात दोघांनी एकमेकांचा हात पकडून एन्ट्री केली. आणि या संपूर्ण कार्यक्रमात ते दोघे एकमेकांचा हात पकडूनच दिसले. 

या कार्यक्रमा दरम्यानची अनुष्काची एक कॅडिंड मुमेंट कॅमेऱ्यात कैद झाली. दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन बसले होते. आणि अनुष्का विराटच्या हातावर आपली बोटे फिरवत होती. या त्यांचा खास रोमँटिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.