Arijit Singh: एक ही दिल है अरिजित; MS Dhoni दिसताच केला पायांना स्पर्श, VIDEO पाहिला का?

Arijit Singh,IPL 2023: आयपीएलच्या ग्रैंड ओपनिंग सेरेमनीमध्ये रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि सिंगर अरिजीत सिंहने आपली कला दाखवत परफॉर्म केलं. त्यावेळी धोनी स्टेजवर आला अन्...

Updated: Apr 1, 2023, 04:56 PM IST
Arijit Singh: एक ही दिल है अरिजित; MS Dhoni दिसताच केला पायांना स्पर्श, VIDEO पाहिला का? title=
Arijit Singh dhoni

Arijit Singh Touches MS Dhoni’s Feet: आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात पांड्याच्या गुजरातने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव केलाय. त्याआधी अहमदाबादमध्ये रंगारंग उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अरिजित सिंगने (Arijit Singh) आपल्या मधूर आवाजात चार चांद लावले. आपल्या धमाकेदार परफॉर्मन्सने अरिजितने सर्वांची मने जिंकली. मात्र, अरिजितच्या गाण्यापेक्षा त्याच्या एका कृत्यापेक्षा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलाय.

Arijit Singh ने काय केलं?

आयपीएलच्या ग्रैंड ओपनिंग सेरेमनीमध्ये रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna), तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि सिंगर अरिजीत सिंहने आपली कला दाखवत परफॉर्म केलं. रश्मिका मंदान्ना, तमन्ना भाटियाचा परफॉर्मन्स पूर्ण झाला मग एमएस धोनी (MS Dhoni) स्टेजवर पोहोचला, माही स्टेजवर पोहोचताच अरिजित सिंगने धोनीच्या पायांना स्पर्श केला. त्याचा व्हिडिओ (Video) सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

पाहा VIDEO -

सध्या सोशल मीडियावर अरिजित सिंग पायाला स्पर्श (Arijit Singh Touches MS Dhoni’s Feet) करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. धोनीच्या चाहत्यांनी अरिजितचं तौंडभरून कौतूक केलंय. त्याचबरोबर सध्या फोटो देखील तुफान व्हायरल होताना दिसत आहे. चेन्नईने सामना हरला असला तरी अरिजित सिंगने चेन्नईचं मन जिंकलंय हे पक्कं...

आणखी वाचा -  CSK vs GT: चेन्नईच्या पराभवाला धोनीच जबाबदार; 'या' तीन खेळाडूंनी ओढले ताशेरे!

दरम्यान, पहिल्या सामन्यात गुजरातने विजय मिळवल्यानंतर आता शनिवारी दोन सामने खेळवले जात आहेत. कोलकाता आणि पंजाब (Punjab Kings vs Kolkata Knight Riders) यांच्यात दुसरा सामना खेळला जातोय. तर तिसऱ्या सामन्यात दिल्ली आणि लखनऊ (Lucknow Super Giants vs Delhi Capitals) भिडणार आहे. त्यामुळे आता चुरशीच्या लढती पहायला मिळतील, अशी अपेक्षा सर्व क्रिकेटप्रेमींना आहे.