VIDEO: 6,6,6,6,6,6,6,6,6... 16 चेंडूत 90 धावा; महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये नाशिकच्या मुलाची कमाल

Maharashtra Premier League 2023 :  सोमवारी महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये 18 वर्षीय नाशिकच्या मुलाने कमाल केली आहे. 16 चेंडूत त्याने 6,6,6,6,6,6,6,6,6 ठोकले. त्यानंतर त्याने 4 विकेटही घेतले. 

Updated: Jun 20, 2023, 11:21 AM IST
VIDEO: 6,6,6,6,6,6,6,6,6... 16 चेंडूत 90 धावा; महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये नाशिकच्या मुलाची कमाल title=
arshin kulkarni hits fastest century in maharashtra premier league history hits 13 sixes and claimed 4 wickets nashik titans win puneri bappa

Arshin Kulkarni Century : नाशिकमधील 18 वर्षांच्या खेळाडूने क्रिकेटच्या मैदानात तुफान बँटिंग करुन क्रिकेट जगतात नव्या विक्रम केला आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये या नाशिकच्या लेकाने 6,6,6,6,6,6,6,6,6 असे सिक्सर मारून 16 चेंडूत 90 रन्स केले. पुण्यात सोमवारी ईगल नाशिक टायटन्स आणि पुणेरी बाप्पा टीममध्ये (MPL 2023 ENT vs PB) लढत झाली. 

नाशिक टायटन्सच्या अर्शिन कुलकर्णीने धमाकेदार शतकी खेळी करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला.  54 बॉलमध्ये 117 रन तर त्याने बनवलेच त्यासोबतच या पठ्ठाने 4 विकेट्सही घेतल्या. या कामगिरीसोबत त्याने महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. अर्शिनने 16 बॉलमध्ये फोर आणि सिक्सरच्या मदतीने 90 रन्स बनवले. पूर्ण खेळाचं बोलायचं झालं तर त्याने 13 सिक्स आणि 3 फोर लगावले. (arshin kulkarni hits fastest century in maharashtra premier league history hits 13 sixes and claimed 4 wickets nashik titans win puneri bappa)

नाशिकच्या पोरांनी रचलेल्या धावसंख्येच्या डोंगरला तडा देण्यासाठी पुणेरी बाप्पा टीमने कर्णधार ऋतुराज गायकवाडसह प्रत्येक खेळाडूनेंही कमाल खेळी केली.

शेवटच्या ओव्हरमध्ये पुण्याला जिंकण्यासाठी फक्त 6 रन्सची गरज होती. पण नाशिककडून ही ओव्हर अर्शिनने देण्यात आली होती. अर्शिनला वेगवान आणि कमाल बाँलिंगसमोर पुण्याचा 1 रन्सने पराभव झाला.