Sara Tendulkar : शुभमन गिलचा बेस्ट फ्रेंड सारा तेंडुलकरच्या प्रेमात? पाहा कोण आहे हा खेळाडू?

Sara Tendulkar : शुभमन आणि सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) यांच्या अफेअरची सोशल मीडियावर चर्चा असते. मात्र अशातच सोशल मीडियावर आता टीम इंडियाचा अजून एक खेळाडू साराच्या प्रेमात असल्याचं म्हटलं जातंय. 

Updated: Jun 19, 2023, 08:58 PM IST
Sara Tendulkar : शुभमन गिलचा बेस्ट फ्रेंड सारा तेंडुलकरच्या प्रेमात? पाहा कोण आहे हा खेळाडू? title=

Sara Tendulkar : टीम इंडियाच्या ( Team India ) खेळाडूंना सध्या आराम करण्याची संधी आहे. नुकतंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीमने भारताचा पराभव केला. डब्लूटीसी फायनलनंतर टीम इंडियाला तब्बल एका महिन्याची सुट्टी आहे. यावेळी टीम इंडियाचा ( Team India ) हँडसम हंक शुभमन गिल ( Shubman Gill ) त्याचा खास मित्र ईशान किशन ( Ishan Kishan ) सोबत सुट्टीचा आनंद घेतोय. शुभमन आणि सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) यांच्या अफेअरची सोशल मीडियावर चर्चा असते. मात्र अशातच सोशल मीडियावर आता टीम इंडियाचा अजून एक खेळाडू साराच्या प्रेमात असल्याचं म्हटलं जातंय. 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) आणि शुभमन गिल ( Shubman Gill ) हे एकमेकांना डेट करत असल्याची कथित चर्चा आहे. दरम्यान यावेळी अजून एका टीम इंडियाचा खेळाडू साराला ( Sara Tendulkar ) पसंत करत असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान हा खेळाडू दुसरा तिसरा कोणीही नसून शुभमन गिलचा ( Shubman Gill ) मित्र इशान किशान आहे. 

ईशानने केली साराची पोस्ट लाईक

टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज इशान किशन सध्या गिलसोबत ( Shubman Gill ) सुट्ट्यांचा आनंद घेतोय. तर दुसरीकडे सारा देखील केनियामध्ये वेकेशन एन्जॉय करतेय. यावेळी तिने सोशल मीडियावर तिच्या सुट्टीदरम्यान फोटो पोस्ट केला. हा फोटो टीम इंडियाचा खेळाडू इशान किशनने ( Ishan Kishan ) लाईक केलाय. त्यामुळे आता इशान साराच्या ( Sara Tendulkar ) प्रेमात असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. 

मुख्य म्हणजे ही शुभमनने ( Shubman Gill ) हे फोटो लाईक न करता इशानने  ( Ishan Kishan ) लाईक केला आहे. त्यामुळे चर्चा अधिकच रंगू लागल्या आहेत. दरम्यान आम्ही या गोष्टीची खातरजमा केली नाही.  

टीम इंडियाचे युवा खेळाडू, शुभमन गिल ( Shubman Gill ) आणि ईशान किशन ( Ishan Kishan ) हे चांगले मित्र आहे. दोघंही एकत्रच खूप मस्ती करताना दिसतात. जुलै महिन्यात वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर टीम इंडियाला 5 टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट सामन्यांची सिरीज खेळायची आहे. दरम्यान या सिरीजसाठी शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x