अराजकीय परिस्थितीचा श्रीलंकेला फटका, एशियन स्पर्धेच्या आयोजनातून आऊट

Asia Cup 2022| आयोजनाच्या स्पर्धेतून श्रीलंका आऊट, या देशाला मिळू शकतो मान  

Updated: Jul 18, 2022, 03:56 PM IST
अराजकीय परिस्थितीचा श्रीलंकेला फटका, एशियन स्पर्धेच्या आयोजनातून आऊट title=

मुंबई : आशिया चषक 2022 श्रीलंकेबाहेर हलवण्याची योजना आखली जात आहे. ESPN क्रिकइन्फो मधील एका अहवालात असे म्हटले आहे की स्पर्धा UAE मध्ये हलवण्याची शक्यता आहे. 

अहवालात पुढे म्हटले आहे की एसीस 22 जुलै रोजी आशिया कपचे वेळापत्रक जाहीर करणार आहे आणि भारत आणि पाकिस्तान लीग यामध्ये दोन वेळा सामने सामने येऊ शकतात. डी सिल्वा म्हणाले की, श्रीलंकेतील इंधनाची तीव्र टंचाई आणि राजकीय अस्थिरतेमुळे भारत आणि पाकिस्तानमधील मध्ये विमान उड्डाणांवर बंधनं येऊ शकतात. 

ते पुढे म्हणाले की, 'टूर्नामेंटमध्ये भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी होऊ शकते. अशावेळी श्रीलंकेत आयोजन केलं तर त्याचा परिणाम क्रिकेटप्रेमींवरही होईल. ते श्रीलंकेत येण्यासाठी घाबरतील. त्यामुळे श्रीलंका सोडून दुसरीकडे आयोजन केलं जाऊ शकतं.

श्रीलंकेत सध्या अराजकता आहे. तिथली आर्थिक व्यवस्था डळमळीत झाली आहे. बरंच नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये तिथे स्पर्धा घेणं किती योग्य आहे असा प्रश्न आयोजकांना आहे. त्यामुळे अहवालानुसार ही स्पर्धा श्रीलंकेत होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

श्रीलंकेतील एकूण स्थिती पाहता तिथे एशिया कप आयोजित करणं शक्य नाही. UAE मध्ये ही स्पर्धा होऊ शकते असं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता 22 जुलै रोजी  होणाऱ्या बैठकीत नेमकं कोणत्या देशाकडे आयोजनाची जबाबदारी जाणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. 

आशिया कपचा 15 वा सीजन होणार आहे. 1984 मध्ये शारजाह इथे पहिल्यांदा ह्या कपची सुरुवात झाली. या टुर्नामेंटमध्ये भारत सर्वात यशस्वी टीम ठरली आहे. टीम इंडिया 7 वेळा हा जिंकली आहे. श्रीलंकेनं 5 वेळा जिंकला आहे. तर पाकिस्ताननं 2 वेळा कप जिंकला आहे.