Asia Cup 2023 Schedule: क्रिकेट प्रेमींसाठी फार आनंदाची बातमी आहे. अखेर आशिया कपच्या ( Asia Cup ) तारखांची घोषणा करण्यात आली आहे. एशियन क्रिकेट काउंसिल ( ACC ) ने गुरुवारी याबाबतची माहिती दिलीये. यंदाचा आशिया कप हा हायब्रिड मॉडलनुसार ( Hybrid Model ) खेळवण्यात येणार आहे. मात्र यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
यामध्ये केवळ पाकिस्तान ( Pakistan ) या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार नाही. आता ही स्पर्धा दोन वेगवेगळ्या देशांमध्ये खेळवली जाणार आहे. यानुसार, पाकिस्तानमध्ये ( Pakistan ) केवळ 4 सामने खेळवले जाणार आहेत. तर या स्पर्धेचे उर्वरित सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का मानला जातो.
आशियाई क्रिकेट परिषदेने ( Asian Cricket Council ) 2023 आशिया कपसाठी हायब्रिड मॉडेल ( Hybrid Model ) स्वीकारलंय. कॉन्टिनेन्टल चॅम्पियनशिप दोन देशांमध्ये म्हणजे पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांमध्ये होणार आहे. जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ACC बैठकीत हायब्रीड मॉडेलला परवानगी देण्यात आली आहे. समोर आलेल्या वेळापत्रकानुसार, आशिया कप 31 ऑगस्टपासून सुरू होणार असून तर अंतिम सामना 17 सप्टेंबरला खेळवला जाणार आहे.
Asia Cup 2023 will be held from 31st August to 17th September 2023 and will see the elite teams from India, Pakistan, Sri Lanka, Bangladesh, Afghanistan, and Nepal, compete in a total of 13 exciting ODI matches.
The tournament will be hosted in a hybrid model with four matches… pic.twitter.com/uRs0vT7Ei7— ANI (@ANI) June 15, 2023
आशिया कपमध्ये भारत ( Team India ) आणि पाकिस्तान ( Pakistan ) या टीम्ससह एकूण 6 टीम्समध्ये 13 सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेची फायनल श्रीलंकेच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या 6 टीम्स दोन गटात विभागल्या जाणार आहे.
या स्पर्धेसाठी 2 गट तयार करण्यात आले असून एका गटात भारत ( Team India ) , नेपाळ आणि पाकिस्तानचा समावेश आहे. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा दुसऱ्या गटात समावेश असेल. दोन्ही गटातील प्रत्येकी दोन टीम सुपर 4 मध्ये पोहोचणार आहेत.