India vs Nepal, Asia Cup 2023: पाकिस्तानविरुद्ध सामना (IND vs PAK) रद्द करावा लागल्यानंतर आता भारतीय संघ दुबळ्या नेपाळ संघाशी (IND vs NEP) भिडणार आहे. उद्या म्हणजेच सोमवारी दुपारी 3 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. मात्र, नेपाळविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियााला मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) मायदेशी परतला असल्याने आता बुमराहच्या जागी संघात शमीची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघ आणखी मजबूत झाल्याचं दिसतंय. नेपाळविरुद्ध सामना जिंकणं अवघड असणार नाही. मात्र, सर्वांची चिंता वाढलीये ती पावसानं...
जर भारतीय संघाने हा सामना जिंकला तर टीम थेट आशिया कपच्या सुपर-4 मध्ये पोहोचेल. पण पल्लेकेलेचे हवामान (India vs Nepal Rain Prediction) खूपच खराब दिसतंय. सोमवारी पल्लेकेलेमध्ये पावसाची शक्यता 89 टक्के आहे. अशा स्थितीत सामना वाहून जाण्याची शक्यता आहे. असं झालं आणि पावसामुळे सामना रद्द झाला तर? हा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. जर सामना रद्द झाला तर भारत आणि नेपाळला 1-1 असे समान गुण मिळाले, तर भारतीय संघ सुपर-4 साठी पात्र ठरणार आहे.
ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ या तीन संघाचा समावेश आहे. नेपाळ आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांना 2 अंक मिळाले. तर दुसऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना 1 गुण मिळाला. त्यामुळे आता पाकिस्तानकडे आता 3 गुण आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा संघ ग्रुप ए मध्ये अव्वल स्थानी आहे. तर टीम इंडियाला मागील सामन्यात 1 गुण मिळालाय. तर नेपाळचा सामना ड्रॉ देखील झाला नाही अन् त्यांना विजय देखील मिळवता आला नाही. त्यामुळे आता नेपाळ स्पर्धेतून बाहेर होईल, अशी शक्यता आहे.
दरम्यान, पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळचा तब्बल 238 धावांनी पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तानला 4.76 गुण मिळाले असून पाकिस्तानचा संघ पाईंट्स टेबलवर अव्वल स्थानी आहे. त्यामुळे टीम इंडियाला अव्वल स्थान गाठायचं असेल तर नेपाळचा दारूण पराभव करणं गरजेचं आहे. अव्वल स्थान गाठलं तर टीम इंडिया ग्रुप बी मधील क्रमांक दोनच्या संघाशी भिडताना दिसेल. त्यामुळे आशिया कप फायनलचा रस्ता पक्का होईल.