Asia Cup 2023: येत्या 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सरुवात होणार असून 17 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यंदा पाकिस्तान या स्पर्धेंचं आयोजन करतंय. हायब्रीड मॉडेलवर ही स्पर्धा होत असून काही सामने पाकिस्तानात तर काही सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतला पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळदरम्यान मुलतानमध्ये खेळवला जाणार आहे. पण स्पर्धा सुरु होण्याआधीच एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. एशिया कप स्पर्धेवर कोरोनाचं (Corona) सावट पसरलं आहे.
स्पर्धेवर कोरोनाचं सावट
एशिया कप स्पर्धेला काही दिवसांचा अवधी बाकी असतानाच श्रीलंकेतून (Sri Lanka) एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार श्रीलंका क्रिकेट संघाचे दोन खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सलामीचा फलंदाज अविष्का फर्नांडो (Avishka Fernando) आणि विकेटकिपर-फलंदाज कुसल परेरा (Kusal Perera) या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.
अविष्का फर्नांडोला याआधीही कोरोनाची लागण झाली होती. गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुध्दच्या एकदिवसीय मालिकेआधी अविष्का फर्नांडो कोव्हिड पॉझिटिव्ह आढळला होता. बूस्टर डोस घेतल्यानंतरही अविष्काला कोरोनाची लागण झाली होती. कुसल परेराही दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या क्रिकेट मालिकेआधी कुसल परेराला कोरोनाची लागण झाली होती.
श्रीलंक करणार टीमची घोषणा
एशिया कप 2023 स्पर्धेसाठी श्रीलंकेने अद्याप संघाची घोषणा केलेली नाही. भारत, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशने आपापल्या संघांची घोषणा केली आहे. हायब्रिड मॉडेलनुसार एशिया कप स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानात तर फायनलसह नऊ सामने श्रीलंकेत रंगणार आहेत. एशिया कप स्पर्धेत भारत,पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघ सहभागी होणार आहेत.
एशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक
30 ऑगस्ट : पाकिस्तान vs नेपाळ - मुलतान
31 ऑगस्ट: बांग्लादेश vs श्रीलंका - कँडी
2 सप्टेंबर : भारत vs पाकिस्तान - कँडी
3 सप्टेंबर : बांग्लादेश vs अफगाणिस्तान - लाहोर
4 सप्टेंबर: भारत vs नेपाल - कँडी
5 सप्टेंबर : श्रीलंका vs अफगाणस्तान - लाहोर
6 सप्टेंबर : A1 Vs B2 - लाहोर
9 सप्टेंबर : B1 vs B2 - कोलंबो
10 सप्टेंबर : A1 vs A2 - कोलंबो
12 सप्टेंबर : A2 vs B1 - कोलंबो
14 सप्टेंबर : A1 vs B1 - कोलंबो
15 सप्टेंबर : A2 vs B2 - कोलंबो
17 सप्टेंबर : फाइनल - कोलंबो