Ind vs Aus : ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत (Ind vs Aus) यांच्यामध्ये वनडे सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या सिरीज देखील खिशात टाकली आहे. भारताच्याच भूमीवर भारतीयांचा हा लाजीरवाणा पराभव आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे विराट कोहलीची अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यामध्ये कांगारूंनी टीम इंडियाचा 21 रन्सने पराभव केला आहे. या पराभवामुळे तीन सामन्यांची सिरीज भारताने 1-2 अशी गमावली आहे. या पराभवाचा परिणाम रँकिंगवरही झाला आहे. भारताला मागे टाकून ऑस्ट्रेलिया वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.
तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या वेळी प्रथम फलंदाजी करत 49 ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाने 269 रन्सपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक म्हणजेच 47 रन्सची खेळी केली. 49 ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया ऑल आऊट केलं.
270 रन्सच्या टारगेटचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीमला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 65 रन्सची पार्टनरशिप केली केली. मात्र 10व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर रोहित आऊट झाला. त्यानंतर 13व्या ओव्हरमध्ये शुभमन गिलही पॅव्हेलियनमध्ये परतला.
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने लाज राखली. विराटने आजच्या सामन्यात अर्धशतक झळकावलं. विराटने केएल राहुलच्या मदतीने तिसऱ्या विकेटसाठी 69 रन्स केले. विराटने 72 बॉल्समध्ये 54 रन्सची खेळी केली. मात्र त्याला टीमला विजय मिळवून देता आला नाही.
तिसऱ्या वनडे सामन्यात देखील सूर्यकुमार यादव फेल झाला. या निर्णयक सामन्यात सूर्याच्या तुफान खेळीची टीम इंडियाला आवश्यकता होती. मात्र मैदानात उतरताच पहिल्याच बॉलवर सूर्यकुमार पव्हेलियनमध्ये परतला. सलग तिसऱ्या सामन्यात सूर्या पहिल्याच बॉलवर आऊट झाल्याची घटना घडली आहे.