'सूर्या'स्त! Suryakumar Yadav ची नकोशी हॅट्रिक, सलग तिसऱ्या सामन्यात पहिल्याच बॉलवर OUT

विराट कोहलीची विकेट पडताच सूर्यकुमार मैदानात उतरला. यावेळी सूर्या मोठी आणि टीमला जिंकवून देण्याची खेळी करेल असा अंदाज होता. मात्र आल्या आल्या Ashton Agar च्या पहिल्याच बॉलवर सूर्या बोल्ड झाला.

Updated: Mar 22, 2023, 09:10 PM IST
'सूर्या'स्त! Suryakumar Yadav ची नकोशी हॅट्रिक, सलग तिसऱ्या सामन्यात पहिल्याच बॉलवर OUT title=

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये तिसरी आणि निर्णायक वनडे खेळवण्यात येतेय. तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवकडून (Suryakumar Yadav) चांगल्या खेळीची अपेक्षा केली जात होती. मात्र यावेळी देखील सूर्यकुमार फेल झाला आहे. मैदानावर येताच पुन्हाच पहिल्याच बॉलवर सूर्या विकेट गमावून बसलाय. यामुळे त्याचे चाहते नाराज आहेत.

तिसऱ्या सामन्यातही सूर्या शून्यावर बाद

आजच्या सामन्यात सूर्याच्या तुफान खेळीची टीम इंडियाला गरज होती. विराट कोहलीची विकेट पडताच सूर्यकुमार मैदानात उतरला. यावेळी सूर्या मोठी आणि टीमला जिंकवून देण्याची खेळी करेल असा अंदाज होता. मात्र आल्या आल्या Ashton Agar च्या पहिल्याच बॉलवर सूर्या बोल्ड झाला. दरम्यान स्वतःची विकेट गेल्यानंतर सूर्याही फार हताश दिसला.

तिसऱ्यांदा सूर्या गोल्डन डक

सूर्यकुमारची टी-20 मधील कामगिरी पाहता, त्याचा वनडे टीममध्ये समावेश करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे सिरीजमध्ये त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश केला होता. यानंतर अनुक्रमे पहिल्या सामन्यात पहिल्याच बॉलवर शून्य, दुसऱ्या सामन्यात देखील पहिल्याच बॉलवर शून्य आणि हेच तिसऱ्या सामन्यात देखील पहायला मिळालं. तिसऱ्या सामन्यात सूर्या बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा देखील काहीसा निराश दिसला.