ऑस्ट्रेलियन ओपन : श्रीकांत सेमीफायनलमध्ये, सिंधूचे आव्हान संपुष्टात

भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने आपली विजयी वाटचाल कायम राखताना ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. मात्र दुसरीकडे महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही.सिंधूचे आव्हान संपुष्टात आलेय.

Updated: Jun 23, 2017, 05:13 PM IST
ऑस्ट्रेलियन ओपन : श्रीकांत सेमीफायनलमध्ये, सिंधूचे आव्हान संपुष्टात title=

सिडनी : भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने आपली विजयी वाटचाल कायम राखताना ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. मात्र दुसरीकडे महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही.सिंधूचे आव्हान संपुष्टात आलेय.

श्रीकांतने क्वार्टरफायनलमध्ये बी.साईप्रणीथचा पराभव केला. ४३ मिनिटे चाललेल्या खेळात श्रीकांतने प्रणीथला २५-२३, २१-१७ असे सरळ दोन गेममध्ये हरवले. 

महिला एकेरीत सिंधूला चीनच्या जु यिंगने २१-१०, २०-२२, १६-२१ असे हरवले. सिंधूने पहिला गेम जिंकत चांगली सुरुवात केली होती. मात्र विजयाची हीच लय तिला पुढे कायम राखता न आल्याने पराभवास सामोरे जावे लागले.