WWE मध्ये दिसणार पहिली भारतीय महिला

रिंगमध्ये कविता देवी द ग्रेट खलीच्या विद्यार्थ्यांना रिंगमध्ये धुळ चारणारी कविता देवा आता लवकरच  WWE मध्ये दिसणार आहे.  

Updated: Jun 23, 2017, 07:53 PM IST
WWE मध्ये दिसणार पहिली भारतीय महिला title=

मुंबई : रिंगमध्ये कविता देवी द ग्रेट खलीच्या विद्यार्थ्यांना रिंगमध्ये धुळ चारणारी कविता देवा आता लवकरच  WWE मध्ये दिसणार आहे.  कविता ही WWE मध्ये जाणारी पहिली भारतीय महिला आहे. हार्ड केडीच्या नावाने ती आता या रिंगमध्ये जगातील इतर रेसलर्सला धुळ चारतांना दिसणार आहे. 

कविता ही हरियाणाचजी राहणारी आहे. द ग्रेट खलीच्या मार्गदर्शनाखाली तिने याचं ट्रेनिंग घेतलं. या वर्षी दुबईमध्ये झालेल्या स्पर्धेत तिने भाग घेतला होता. कविता प्रथमच होणाऱ्या माय यंग क्लासिकमध्ये 30 इतर महिला रेसलर्ससोबत सहभाग घेणार आहे.

कविताने म्हटलं की, मला आनंद आहे की WWE महिला स्पर्धेत मी  सहभागी होत आहे. मी मध्या प्रदर्शनाने भारतीय महिलांना प्रेरित करण्याचा प्रयत्न करणार आहे.