बॉल लागल्याने खेळाडूचं कपाळ फुटलं, टाके लागल्यानंतर ही मैदानावर उतरला

सगळेच प्रेक्षक झाले हैराण

Updated: Jan 11, 2019, 07:09 PM IST
बॉल लागल्याने खेळाडूचं कपाळ फुटलं, टाके लागल्यानंतर ही मैदानावर उतरला

सिडनी : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे सगळेच प्रेक्षक हैराण झाले. मेलबर्न रेनेगेड्स आणि ब्रिस्बेन हीट यांच्यात झालेल्या सामन्यात कॅच पकडताना खेळाडू जखमी झाला. बॉल त्याच्या कपाळाला लागल्याने रक्त वाहू लागलं. पण मैदानातून बाहेर जात असताना देखील त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. बिग बॅश लीगमध्ये बेन कटिंग ब्रिस्बेन हीटकडून खेळतो. ब्रिस्बेन हीटने आधी बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी मेलबर्नसमोर 145 रनचं लक्ष ठेवलं होतं. मेलबर्नने हा सामना जिंकला पण या घटनेमुळे बेन कटिंग चर्चेत आला.

जेम्स पॅटिंसनच्या बॉलवर मार्कस हॅरिसने शॉट मारला. बेन कटिंग कॅच घेण्यासाठी धावत होता. पण बॉल सरळ त्याच्या कपाळावर येऊन लागला. कपाळाला बॉल लागल्याने रक्त वाहू लागलं. बेनला बॉल लागल्याने टाके लावावे लागले. पण तो पुन्हा मैदानावर आला. बेन कटिंग आयपीएलमध्ये मुंबई इंडियंसकडून खेळतो. मुंबई इंडियंसने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात असं म्हटलं आहे की, 'बेन कटिंगच्या चेहऱ्याला दुखापत झाली. त्याला लवकर बरा हो चॅम्पियन'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Ben's got cuts and stitches. Get well soon, champ . #CricketMeriJaan @cuttsy_31 @erinvholland

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians) on