मुंबई : भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या टी-२० टीमची घोषणा करण्यात आली आहे. १६ जणांच्या या टीममध्ये संजू सॅमसनला वगळण्यात आलेलं आहे. संजू सॅमसनला श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये फक्त एका मॅचसाठी सॅमसनला संधी देण्यात आली होती. या मॅचमध्ये सॅमसनला ६ रन करता आले होते. आता पुन्हा एकदा सॅमसनच्या पदरी निराशा पडली आहे.
एकीकडे ऋषभ पंत वारंवार अपयशी ठरत असताना त्याला संधी दिली जात आहे, पण संजू सॅमसनला एकच मॅच खेळवून डच्चू देण्यात आल्यामुळे टीम इंडियाच्या निवडीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दुसरीकडे श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये आराम दिलेल्या रोहित शर्माचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टी-२० सीरिजला २४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया ५ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपआधी ही सीरिज महत्त्वाची मानली जात आहे.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, मनिष पांडे, ऋषभ पंत, कुलदीप यादव