मुंबई : पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या महिला टी-२० वर्ल्डकप होतो आहे. त्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरकडे टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची धुरा देण्यात आली आहे. स्मृती मनधाना टीम इंडियाची उपकर्णधार असणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना २१ फेब्रुवारी रोजी यजमान ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
टी20 सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या त्रिशंकू मालिकेसाठी १६ सदस्यांची टीम घोषित करण्यात आली आहे. ज्यामध्ये नुजहत परवीनला संधी मिळाली आहे. ही मालिका ३१ जानेवारीपासून सुरु होणार आहे. ज्यामध्ये इंग्लंड देखील आहे.
वर्ल्डकपसाठी टीम
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, ऋचा घोष, तानिया भाटिया (विकेटकीपर), पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी.
त्रिशंकू मालिकेसाठी टीम
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, ऋचा घोष, तानिया भाटिया (विकेटकीपर), पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, नुजहत परवीन.