मोठी बातमी: बेन स्टोक्सची वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

आपल्या खेळाने सगळ्यांनाच प्रभावित करणाऱ्या या खेळाडून वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Updated: Jul 18, 2022, 05:31 PM IST
मोठी बातमी: बेन स्टोक्सची वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा title=

मुंबई : बेन स्टोक्सने वयाच्या 31 व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेट (ODI) मधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता तो मंगळवारी आफ्रिकेविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळणार आहे. इंस्टाग्रामवर त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने लिहिले की, मी मंगळवारी डरहममध्ये इंग्लंडसाठी एकदिवसीय क्रिकेटमधील माझा शेवटचा सामना खेळणार आहे. (Ben Stokes announces retirement from ODI cricket)

तो पुढे म्हणाला की, ''आता या फॉरमॅटमध्ये तो आपल्या संघासाठी 100 टक्के देऊ शकत नाही. व्यस्त शेड्युलमुळे मी माझ्या शरीरावर भार टाकत आहे असे मला वाटले, तर मला असेही वाटले की मी अशा व्यक्तीची जागा घेत आहे जो इंग्लंड संघाला खूप काही देऊ शकेल."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ben Stokes (@stokesy)

2019 मध्ये, इंग्लंडने प्रथमच क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यात स्टोक्सची महत्त्वाची भूमिका होती. त्याने स्पर्धेत 465 धावा केल्या आणि अंतिम सामन्यात अप्रतिम खेळी खेळली. स्टोक्सच्या नाबाद 84 धावांच्या जोरावर सुपर ओव्हरमध्ये सामना बरोबरीत सुटला तेव्हा चौकारांच्या संख्येच्या आधारे इंग्लंडने सामना जिंकला.