close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विराट मैदानात 'बेन स्टोक्स' म्हणत नाही तर... बेन स्टोक्सचा ट्विटर सोडण्याचा इशारा

टीम इंडियाचा कर्णधार मैदानामध्ये जल्लोष साजरा करताना 'बेन स्टोक्स' म्हणतो

Updated: Jun 17, 2019, 06:49 PM IST
विराट मैदानात 'बेन स्टोक्स' म्हणत नाही तर... बेन स्टोक्सचा ट्विटर सोडण्याचा इशारा

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार मैदानामध्ये जल्लोष साजरा करताना 'बेन स्टोक्स' म्हणतो, असे काही ट्विट गेल्या काही दिवसांपासून व्हायरल झाले आहेत. या ट्विटनी आता इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सही हैराण झाला आहे. 'यापुढे विराट कोहली मैदानात बेन स्टोक्स म्हणतो, असं ट्विट कोणी केलं तर मी माझं ट्विटर अकाऊंट डिलीट करीन,' असा इशारा खुद्द बेन स्टोक्सने दिला आहे. पहिले एक लाख वेळा हा विनोद मला आवडला, असंही स्टोक्स त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.

टीम इंडियाच्या बॉलरनी विकेट घेतल्यानंतर विराट कोहली मैदानात जोरदार जल्लोष करतो. हा जल्लोष करत असताना विराट कोहली जे शब्द वापरतो त्यावरुन त्याच्यावर ट्विटरवरून निशाणा साधण्यात येत आहे. याबद्दलचे अनेक मिम्सही व्हायरल झाले आहेत.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये ३० जूनरोजी वर्ल्ड कपचा सामना होणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणि बेन स्टोक्स एकमेकांविरुद्ध खेळतील. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये भारताचा ८९ रननी विजय झाला. या मॅचमध्ये विराटने अर्धशतकी खेळी केली.