Sanjana Ganesan: 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये इंग्लंडविरूद्ध तिसऱ्या टेस्टला सुरुवात होणार आहे. नुकतंच उर्वरित तीन टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी टीम इंडियाच्या ( Team India ) उप कर्णधारपदाची धुरा जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah ) खांद्यावर देण्यात आली आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah ) त्याची पत्नी संजय गणेशनसोबत ( Sanjana Ganesan ) एक व्हिडीओ शेअर केलाय. यावेळी संजना जाड झालीये, असं चाहत्यांनी तिला ट्रोल केलंय. मात्र यावेळी संजनाने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे.
तीन टेस्ट सामने बाकी असून इंग्लंड विरूद्धची सिरीज सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिली टेस्ट बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने जिंकली होती तर दुसरी टेस्ट टीम इंडियाने ( Team India ) जिंकली होती. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah ) सामन्यात 9 विकेट घेत भारताला सिरीज बरोबरीत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्यानंतर भारतीय क्रिकेट टीममधील इतर खेळाडूंप्रमाणे जसप्रीत बुमराहनेही आपल्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवला.
जसप्रीत बुमराहने पत्नी संजना गणेशनसोबतचा ( Sanjana Ganesan ) एक फोटोही पोस्ट केला केलाय. यावेळी तिने, आनंद याठिकाणी आहे, असं कॅप्शन दिलं आहे. संजना ही प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर आहे. नुकतंच या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलंय. दरम्यान या पोस्टवर एका युझरने 'व्हॅलेंटाईन डे' कनेक्शनसह प्रमोशनल पोस्टमध्ये संजना गणेशनवर बॉडी शेमिंगची टीका केलीये.
बुमराह ( Jasprit Bumrah ) आणि संजनाच्या ( Sanjana Ganesan ) व्हिडीओवर एका युझरने कमेंट केलीये की, भाभी थोडी मोटी लग रही है, (वहिनी, जाड दिसत आहेत."
युझरच्या या कमेंटवर संजनाने ( Sanjana Ganesan ) लिहिलंय की, तुम्हाला शाळेतील विज्ञानाच्या पुस्तकांमधील गोष्टी आठवत नाहीत. तुम्ही जाड महिलांच्या शरीरयष्टीवर भाष्य करताय. पळा इथून. संजना गणेशनच्या या कमेंटचं सर्वजण कौतुक करतायत. अशा फोटोंवर टीका करणं कोणत्याही बाबतीत विनोदी गोष्ट नाही. संजनाने मुलाला जन्म दिला असून गरोदरपणात वजन वाढणं स्वाभाविक आहे, असंही अनेकांनी म्हटलं आहे.
Sanjana Ganesan's reply on the Instagram post. pic.twitter.com/DgIhrtRurs
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 12, 2024