World Cup : भारत-पाक सामन्यापूर्वी वाईट बातमी; दोन देशांचे कर्णधार जखमी, टेन्शन वाढलं

IND vs PAK: वर्ल्डकपमध्ये आज मोठा आणि हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी 2 देशांचे कर्णधार दुखापतग्रस्त झाल्याचं समोर आलंय. 

सुरभि जगदीश | Updated: Oct 14, 2023, 11:40 AM IST
World Cup : भारत-पाक सामन्यापूर्वी वाईट बातमी; दोन देशांचे कर्णधार जखमी, टेन्शन वाढलं title=

IND vs PAK: वर्ल्डकपमध्ये आज मोठा आणि हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. चाहत्यांना ज्या सामन्याची उत्सुकता होती, तो सामना अखेर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) आज वर्ल्डकप 2023 मध्ये आमने-सामने येणार असून या सामन्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आलीये. भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी 2 देशांचे कर्णधार दुखापतग्रस्त झाल्याचं समोर आलंय. 

13 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर न्यूझीलंड आणि बांगलादेश टीम आमनेसामने होत्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश टीमने न्यूझीलंडसमोर 246 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. न्यूझीलंडच्या टीमने 246 रन्सचं सोपं लक्ष्य अगदी सहज गाठलं. अखेर 8 विकेट्सने न्यूझीलंडचा विजय झाला. मात्र या सामन्यानंतर दोन्ही देशांचे कर्णधार जखमी झाल्याने न्यूझीलंड आणि बांगलादेशाच्या टीमचं टेन्शन वाढलं आहे. 

केन आणि शाकिब दुखापतग्रस्त

न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पहिल्याच सामन्यात खेळला होता. बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात केनच्या हाताला बॉल लागला त्यामुळे त्याला दुखापत झाली. फलंदाजी करताना त्याला ही दुखापत झाली. यानंतर काही वेळ मैदानावर राहिल्यानंतर त्याने पुन्हा डगआऊटवर जाण्याचा निर्णय घेतला. 

सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये बोलताना केन म्हणाला की, “या दुखापतीमुळे बॅट पकडणं थोडं कठीण झालं. अंगठ्याच्या बाजूला थोड्या वेदना होतायत” 

यासोबतच शाकिब अल हसनलाही सामन्यादरम्यान दुखापत झाल्याचं दिसून आलं. सामन्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये शाकिब अल हसनच्या जागी शांतो आला होता. यावेळी शांतोने सांगितलं की, शाकिब स्कॅनसाठी गेला आहे. दरम्यान शाकिबची दुखापत कितपत गंभीर आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. भारत पाकिस्तान यांच्या सामन्यापूर्वीच या दोन देशांचे कर्णधार दुखापत झाल्याची बातमी मिळाली.

दुखापतीमुळे दीर्घकाळ मैदानापासून लांब होता केन

न्यूझीलंडचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज आणि कर्णधार केन विल्यमसनला दुखापत झाली. केन विलियम्सन आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळत होता. यावेळी करताना दुखापत झाली त्यामुळे तो 5 महिने क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर आता तो थेट वर्ल्डकपमध्ये परतलाय.