Team India: द.आफ्रिकेविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 'हा' मॅचविनर खेळाडू जाणार बाहेर?

Team India: यापूर्वीच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या सिरीजमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 6, 2023, 09:48 AM IST
Team India: द.आफ्रिकेविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; 'हा' मॅचविनर खेळाडू जाणार बाहेर? title=

Team India: ऑस्ट्रेलियाच्या टी-20 सिरीजनंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाला तिन्ही फॉर्मेटमध्ये सिरीज खेळणायची आहे. मात्र यापूर्वीच टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या सिरीजमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

टीम इंडियाचा क्रिकेटर दीपक चाहरच्या वडिलांची तब्येत बरी नसल्याने तो दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सिरीजमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. नुकतंच दीपक चाहरने त्याच्या वडिलांच्या तब्येतीबाबत अपडेट दिले. त्याचे वडील लोकेंद्र चाहर यांना ब्रेन स्ट्रोकमुळे रूग्णालयात भर्ती करावं लागलं. यामुळे ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत यांच्यामध्ये झालेल्या शेवटच्या टी-20 सामन्यापूर्वी त्याला याच कारणाने घरी परतावं लागलं होतं. वडिलांच्या तब्येतीची माहिती मिळताच, बंगळूरूच्या अलीगढला रवाना झाला होता. 

वडिलांच्या तब्येतीविषयी दिले हेल्थ अपडेट्स

लोकेंद्र चहर यांच्याविषयीच्या आरोग्याबाबत माहिती देताना दीपक म्हणाला की, त्यांची प्रकृती आता सुधारतेय. माझ्यासाठी वडील हे सर्वात महत्त्वाचं असल्याचेही दीपकने सांगितले. त्यामुळे दीपक चहर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून माघार घेण्याची शक्यता आहे. दरम्यान यासंबंधी निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सर्व माहिती देण्यात आली आहे. वडील पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांच्यासोबत राहून त्यांची सेवा करणार असल्याचं दीपकने सांगितलंय.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याबाबत दीपक चहरचं म्हणण आहे की, दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणं हे पूर्णपणे वडिलांच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. वडिलांची तब्येत पूर्णत: सुधारल्यानंतरच पुढचा निर्णय घेणार आहे. याशिवा. आपण टीम मॅनेजमेंटच्या सतत संपर्कात असल्याचेही दीपकने सांगितलंय.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-20 सामन्यांसाठी कशी आहे टीम इंडिया

यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुनील, रवींद्र जडेजा (उपकर्णधार). कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.

वनडेसाठी कशी असेल टीम इंडिया

ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग , दीपक चहर.