रोहित शर्माला मोठा धक्का, पहिल्या 3 सामन्यातून धडाकेबाज फलंदाज OUT?

T20I Series आधी टीम इंडियाला मोठा धक्का, धडाकेबाज फलंदाज बाहेर? 

Updated: Jul 28, 2022, 07:00 PM IST
रोहित शर्माला मोठा धक्का, पहिल्या 3 सामन्यातून धडाकेबाज फलंदाज OUT? title=

मुंबई : वेस्ट इंडिजला वन डे सीरिजमध्ये व्हाईट वॉश दिल्यानंतर आता लगेच टी 20 सीरिज सुरू होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला सामना शुक्रवारी होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसणार आहे. यामागचं कारण म्हणजे धडाकेबाज फलंदाज आणि ओपनर सामना सुरू होण्याआधीच बाहेर जाण्याची शक्यता आहे. 

धडाकेबाज फलंदाज के एल राहुल वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या तीन टी 20 सामन्यात खेळताना दिसणार नाही अशी चर्चा आहे. के एल राहुलला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यातून पूर्णपणे फीट होण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. के एल राहुल संपूर्ण सीरिजमधून बाहेर जाणार की नाही याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळू शकली नाही.  

के एल राहुलला याआधी दुखापत झाली होती. त्याच्यावर जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये तो खेळू शकला नव्हता. आता वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे सीरिजमध्ये त्याला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तो शेवटचा सामना खेळू शकला नाही. त्याला रिकव्हर होण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. 

वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्याला उद्या संध्याकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्यामुळे के एल राहुल खेळणार की नाही याबाबत उद्या संध्याकाळी चित्र अधिक स्पष्ट होऊ शकतं. के एल राहुलऐवजी टीममध्ये कोणाला संधी मिळणार हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.