टीम इंडियाला मोठा झटका, हा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने बाहेर

तिसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाला मोठा झटका

Updated: Jan 9, 2021, 11:03 AM IST
टीम इंडियाला मोठा झटका, हा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने बाहेर title=

सिडनी : तिसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. भारताचा विकेटकिपर रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला असून चाचणीसाठी रवाना झाला आहे. उर्वरीत सामन्यात ऋषभ पंतच्या खेळण्याची शक्यता कमी दिसते आहे. त्याच्या जागी राखीव विकेटकीपर वृद्धीमान साहा मैदानात आला आहे.

सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाची इनिंग 244 रन्सवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियाला 94 रन्सची आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सपुढे टीम इंडियाचे बॅट्समन अपयशी ठरले आहेत. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता एकाही बॅट्समनला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सननं टीम इंडियाच्या 4 बॅट्समनना माघारी पाठवलं.

भारतीय संघासाठी सिडनी कसोटीच्या दुसर्‍या डावात, रिद्धिमान साह आता विकेटकीपर म्हणून मैदानात आला आहे. पंतला फलंदाजी दरम्यान हाताच्या कोपरला बॉल लागल्याने दुखापत झाली.  85 व्या ओव्हरमध्ये कमिन्सचा वेगवान बॉल त्याच्या हाताच्या कोपरला लागल्याने तातडीने फिजिओ मैदानावर आला.

पंत दुखापतीनंतर जास्त वेळ फलंदाजी करू शकला नाही. आणखी दोन धावा करताच तो बाद झाला.  पंतने पहिल्या इनिंगमध्ये 67 बॉलमध्ये 4 फोरच्या मदतीने 36 रन केले होते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x