Mega auction to take place before IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2024 थरार काही दिवसात रंगणार आहे. अशातच आयपीएल कमिटीचे चैयरमन अरूण धूमाळ यांनी स्पष्ट केले आहे की, पूढच्या वर्षीच्या आयपीएलच्या आधी मेगा ऑक्शन होणार. प्रत्येक संघ फक्त 3-4 खेळाडूंना रिटेन करू शकणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
स्पोर्टस्टार सोबत संवाद साधताना अरूण धूमाळ हे बोलले की, "आयपीएल 2025 आधी नक्कीच मेगा लिलाव होईल, जिथे प्रत्येक टीमला तीन-चार खेळाडू निवडायचे आहेत आणि मग प्रत्येक फ्रेंचाईजीकडे नवीन संघ असेल. हे बघणं अधिक मनोरंजक होणार आहे आणि हेच स्वरूप पूढेपण सुरू राहील." यानंतर धूमाळ बोलले की, "आशा आहे की मेगा ऑक्शन तेवढेच मोठे आणि चांगले होईल. आणि विविध देशांच्या यूवा खेळाडूंना याचा फायदासूद्धा होईल. अफगाणिस्तानसारख्या संघांनाही आयपीएल मेगा ऑक्शनचा फायदा झाला आहे कारण तेथील खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक व्यासपीठ प्राप्त झालेलं आहे."
दोन वर्षांपूर्वी दोन अतिरिक्त संघांचा समावेश झाल्यामुळे, मेगा ऑक्शन बंद करावं असा विचार होता. दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल यांच्यासह काही मालकांनी देखील त्यांची चिंता व्यक्त केली होती. यामुळे संघाचे संतुलन खराब होते असे ते म्हणाले होते, विशेषत: जेव्हा तुम्हाला असे खेळाडू सोडून द्यावे लागतात ज्यांना एखाद्या विशिष्ट फ्रेंचाईजीसोबत खेळण्याची सवय झाली आहे आणि त्यांनी स्वतःचे मोठे नाव बनवले आहे आणि ते खेळाडू भारतासाठीही खेळले आहेत. आयपीएल 2024 चा नवीन सीझन हा 22 मार्चपासून सुरू होणार आहे, आणि या सिझनची पहिली बलाढ्य चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर यांच्यात होणार आहे. तर बघण्यायोग्य गोष्ट असेल की आयपीएलच्या 17 व्या सिझनची पहिली मॅच कोण जिंकणार?