48 तासांत WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर; न्यूझीलंडच्या विजयामुळे टीम इंडियाला धक्का

WTC Points Table: न्यूझीलंडने पहिल्या टेस्ट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 281 रन्सने पराभव झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची टीम पहिल्या डावात 511 रन्सवर सर्वबाद झाली होती.

Updated: Feb 7, 2024, 07:55 PM IST
48 तासांत WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर; न्यूझीलंडच्या विजयामुळे टीम इंडियाला धक्का  title=

WTC Points Table: पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 281 रन्सने पराभव केला. या विजयासहा न्यूझीलंडच्या टीमने सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी देखील घेतली आहे. या विजयाचा न्यूझीलंडच्या टीमला चांगला फायदा झाला आहे. मात्र किवींच्या या विजयामुळे टीम इंडियाला मात्र मोठा धक्का बसला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम अव्वल स्थानावर आहे. 

न्यूझीलंडने पहिल्या टेस्ट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 281 रन्सने पराभव झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची टीम पहिल्या डावात 511 रन्सवर सर्वबाद झाली होती. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव केवळ 162 रन्सवर आटोपला. यानंतर न्यूझीलंडला 349 रन्सची आघाडी मिळाली होती. किवी टीमने आपला दुसरा डाव घोषित करत दक्षिण आफ्रिकेसमोर 529 रन्सचं लक्ष्य ठेवलं. यानंतर दक्षिण आफ्रिकेची टीम दुसऱ्या डावात 247 रन्सवर सर्वबाद झाली आणि किवी टीमने सामना जिंकला.

WTC Points Table टीम इंडियाचं मोठं नुकसान

न्यूझीलंड विरूद्ध दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये किवींचा मोठा विजय झाला. या विजयामुळे न्यूझीलंडला फायदा झाला मात्र याचा मोठा फटका टीम इंडियाला बसला आहे. 281 रन्सने विजय मिळवून न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल घडवलाय. किवी टीम आता पहिल्या स्थानी पोहचलीये. ज्यामुळे ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि भारत यांच्या क्रमवारीत घसरण झालीये. 

ऑस्ट्रेलिया दुसऱ्या तर टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलीये. न्यूझीलंडच्या विजयामुळे टीम इंडियाचं नुकसान झालं असून 52.77 विनिंग परसेंटेजनुसार तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. भारताने डब्ल्यूटीसी 2023-25 च्या सिझनमध्ये ​​भारताने आतापर्यंत 6 टेस्ट सामने खेळले असून 3 जिंकले असून 2 गमावलेत. तर एक सामना ड्रॉ राहिलाय. इंग्लंडविरुद्धच्या सिरीजमध्ये अजून 3 सामने शिल्ल्क आहेत. या सामन्यांत विजय मिळवल्यास भारत पुढील काळात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अव्वल स्थानी पोहचू शकते.

न्यूझीलंड पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी

न्यूझीलंडची टीम 24 गुणांसह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबल (WTC पॉइंट टेबल) मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचलीये. न्यूझीलंडची गुणांची टक्केवारी 66.66 आहे. तर ऑस्ट्रेलियाची टीम 10 पैकी 6 सामने जिंकून 66 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.