Pakistan Tour आधी स्टार खेळाडूला जीवे मारण्याची मिळाली धमकी

पाकिस्तान टूर रद्द करण्यामागे हे खरं कारण? खेळाडूला जीवे मारण्याची मिळाली धमकी, कोण आहे हा स्टार खेळाडू?

Updated: Oct 8, 2021, 10:06 PM IST
Pakistan Tour आधी स्टार खेळाडूला जीवे मारण्याची मिळाली धमकी title=

दुबई: दोन टीमने पाकिस्तान दौरे रद्द केले. आता सर्वांना टी 20 वर्ल्ड कपची प्रतिक्षा आहे. आता क्रीडा विश्वातून एक सर्वात मोठी अपडेट येत आहे. किवी संघाने पाकिस्तान टूर रद्द केली. मात्र याच दरम्यान एका दिग्गज खेळाडूला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा खुलासा त्याने केला आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे सध्या क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. 

न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर मार्टिन गुप्टिलने आपल्या संघाने गेल्या महिन्यात पाकिस्तान दौऱ्यातून अचानक माघार घेतल्याबद्दल खेद व्यक्त केला .न्यूझीलंडच्या खेळाडूंची इच्छा होती की टी -20 वर्ल्ड कपआधी पाकिस्तान विरुद्धचा दौरा फायद्याचा ठरेल. 

रावळपिंडीमध्ये पहिला एकदिवसीय सामना सुरू होण्यापूर्वीच न्यूझीलंडने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा अचानक रद्द केला. त्यावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर वादही झाला. त्यावेळी किवी संघाने सुरक्षेचं कारण सांगितलं. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया संघानेही आपला दौरा स्थगित केला. 

हा दौरा रद्द झाल्यानंतर लगेचच पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले की, दौरा सुरू होण्यापूर्वी गुप्टिलला धमकी देणारा मेल त्यांची पत्नी लॉरा मॅकगोल्ड्रिक यांना पाठवण्यात आला होता. गुप्टिल म्हणाला की, या दौऱ्याआधी त्यांना या गोष्टीची चिंता नव्हती. मात्र पत्नीलाही धमकीचा मेल आला. 

टी 20 वर्ल्ड कप आधी हा दौरा झाला असता तर आमचीही तयारी झाली असती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करावा लागला होता. आम्हाला आशा आहे की पाकिस्तानात पुन्हा एकदा पूर्ण सुरक्षेसह लवकरच क्रिकेटचे खेळले जातील. मात्र अशा प्रकारे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणं योग्य नाही असंही मार्टिन गुप्टिल.