RCB आयपीएलमधून बाहेर पडण्याचे तू आहेस कारण...,Virat Kohli वर गंभीर आरोप

आयपीएलच्या क्वालिफायर-2 सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. या पराभवाने आरसीबीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. या पराभवानंतर आता आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीवर टीका करण्यात येत आहे. कोहलीमुळे आरसीबी आयपीएलबाहेर पडल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका बॉलिवूड अभिनेत्याने हा आरोप केलाय. या आरोपांवर आता विराट कोहली काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

Updated: May 28, 2022, 08:03 PM IST
 title=

मुंबई : आयपीएलच्या क्वालिफायर-2 सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. या पराभवाने आरसीबीचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. या पराभवानंतर आता आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीवर टीका करण्यात येत आहे. कोहलीमुळे आरसीबी आयपीएलबाहेर पडल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका बॉलिवूड अभिनेत्याने हा आरोप केलाय. या आरोपांवर आता विराट कोहली काय प्रतिक्रिया देतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

बॉलिवूड अभिनेता आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असलेला कमाल आर खान उर्फ केआरकेने विराट कोहलीवर टीका केली आहे. 'प्रिय विराट कोहली, मी तुला शेवटच्या सामन्यांमध्ये खेळू नकोस असे सांगितले होते, पण तू माझे ऐकले नाहीस. आज आरसीबी आयपीएल 2022 मधून बाहेर पडण्याचे तू कारण आहेस. आशा आहे की तुम्ही लवकरच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर कराल, असे ट्विट केआरकेने केले आहे.  

 

पुढे केआरके म्हणाला, जेव्हा मी ही भविष्यवाणी केली तेव्हा लोक माझ्यावर चिडले. आज माझा अंदाज १००% बरोबर आला कारण मला माहित आहे की विराट कोहली हा RCB दुर्दैवी असल्याची टीका त्याने केली आहे.

अनुष्का शर्मावरूनही टीका 

दरम्यान विराट कोहली केआरकेच्या निशाण्यावर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी केआरकेने कोहलीला अनुष्का शर्माला घटस्फोट देण्याचा सल्ला दिला होता. तो म्हणाला होता की, अनुष्का कोहलीसाठी दुर्दैवी आहे. अनुष्कापासून घटस्फोट घेतल्यानंतरच कोहली फॉर्ममध्ये येईल, असे तो म्हणाला होता. 

आयपीएल कामगिरी 
आयपीएलचा हा सीझन आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खास नव्हता. कोहलीला 16 सामन्यात केवळ 341 धावा करता आल्या. त्याची सरासरी २३ च्या आसपास होती.

आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आरसीबीने चांगली कामगिरी केली होती. लीग टप्पा संपल्यानंतर आरसीबीचा संघ 8 सामने गमावून आणि 6 सामने गमावून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता. एलिमिनेटरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव करून RCB क्वालिफायर-2 साठी पात्र ठरले. मात्र राजस्थान विरूद्ध सामन्यात त्यांचा पराभव झाला आणि पुन्हा एकदा विजेतेपदापासून वंचित राहिली.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x