इंग्लंडमधून भारतीय क्रिकेटपटूंसह त्यांच्या 'सौ.' तुमच्या भेटीला; यातील नवा चेहरा ओळखला का?

अभिनेत्री अनुष्का शर्मा म्हणजेच विराट कोहली याच्या पत्नीनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. 

Updated: Jul 30, 2021, 07:24 PM IST
इंग्लंडमधून भारतीय क्रिकेटपटूंसह त्यांच्या 'सौ.' तुमच्या भेटीला; यातील नवा चेहरा ओळखला का?
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडू आता विवाहबंधनात अडकले आहेत. तर, काही खेळाडूंच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. खेळाडूच नव्हा तर, मुळात कोणतीही सेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्या जोडीदारांबाबत चाहत्यांच्या वर्तुळत कमालीचं कुतूहल पाहायला मिळतं. खेळाडूही याला अपवाद नाहीत. 

कोणत्या क्रिकेटपटूची जोडीदार कशी दिसते, ती काय करते इथपासून त्यांची भेट कुठे झाली, त्यांची प्रेमकहाणी कशी होती हे सारं काही क्रीडारसिकांना जाणून घ्यायचं असतं. आता या सर्व प्रश्नांची उत्तरं कमी- जास्त प्रमाणात मिळतीलही. पण, तूर्तास भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि त्यांच्या सौ. अर्थात त्यांच्या जोडीदारांचे फोटो सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधत आहे. 

अभिनेत्री अनुष्का शर्मा म्हणजेच विराट कोहली याच्या पत्नीनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये विरुष्का व्यतिरिक्त इशांत शर्मा, उमेश यादव आणि के.एल. राहुल झळकत आहेत. इशांत आणि उमेश आपआपल्या पत्नीसोबत दिसत आहेत. तर, राहुलसोबत दिसणारा चेहरा बऱ्याच चर्चांना वाव देत आहे, तर काही गोष्टींची ग्वाही देत आहे. 

के.एल. राहुलसोबत या फोटोमध्ये अभिनेत्री अथिया शेट्टी दिसत आहे. मागील बऱ्याच काळापासून अभिनेता सुनील शेट्टीची लेक म्हणजेच अथिया आणि राहुल रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. या दोघांपैकी कुणीही त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेला नाही. पण, आता अनुष्कानं पोस्ट केलेला हा फोटो मात्र खूप काही सांगून जात आहे. थेट इंग्लंडहून भारतीय क्रिकेट संघातील श्री आणि सौ यांच्या या फोटोमध्ये अथिया आणि राहुलचं एकत्र असणं खुप काही सांगून जात आहे, अशाच प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.