भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकल्यास पंजाब सरकार देणार इतक्या कोटींचं बक्षीस

हॉकी संघातील खेळाडूंसाठी पंजाब सरकारची मोठी घोषणा

Updated: Jul 30, 2021, 07:03 PM IST
भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकल्यास पंजाब सरकार देणार इतक्या कोटींचं बक्षीस

Tokyo Olympics : कोरोना महामारीच्या काळात, सर्व देशांच्या नजरा टोकियोमधील ऑलिम्पिककडे आहेत. भारतीय खेळाडूंनाही भारत जोरदार पाठिंबा देत आहे. त्याचबरोबर खेळाडूंना प्रोत्साहन आणि सन्मान देण्यासाठी विविध राज्यांकडून बक्षिसेही जाहीर केली जात आहेत. यात पंजाबनेही मोठी घोषणा केली आहे. 

पंजाबचे क्रीडामंत्री राणा गुरमीतसिंग सोढी यांनी जाहीर केले आहे की जर भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले तर त्या संघात समाविष्ट असलेल्या राज्यातील सर्व खेळाडूंना 2.5 कोटी रुपये दिले जातील. पंजाबच्या क्रीडामंत्र्यांनी ही घोषणा शुक्रवारी केली, जेव्हा भारतीय संघाने यजमानांच्याच भूमीवर जपानचा 5-3 असा पराभव केला.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारतीय हॉकी संघाची कामगिरी चांगली आहे. सध्याच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या हातून 7-1 च्या पराभवाव्यतिरिक्त भारताने आतापर्यंत स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये एकूण पाच सामने खेळले आहेत, त्यातील चार जिंकले आहेत. भारतीय संघाला सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदारही मानले जाते. जर संघ पदकाचा रंग सुवर्ण करण्यात यशस्वी ठरला, तर त्या संघात जे पंजाबचे खेळाडू आहेत त्यांना 2.25 कोटी रुपये मिळणार आहे.

भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. शुक्रवारी संघाने आशियाई चॅम्पियन जपानला 5-3 ने पराभूत केले. तत्पूर्वी, भारतीय संघाने सध्याचा ऑलिम्पिक विजेता अर्जेंटिनाचा सामना केला. त्यांना ही भारताने 3-1 ने पराभूत केले.