कॅप्टन कूल जवळच्या 'या' खेळाडूनं प्रपोज करण्यासाठी थेट ऑस्ट्रेलियाहून गाठलं इंग्लंड

एम एस धोनीनं या क्रिकेटपटूला खूप समजवून देखील तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि त्याने प्रपोज करण्यासाठी 28 तास प्रवास केला.

Updated: Jun 19, 2021, 12:51 PM IST
कॅप्टन कूल जवळच्या 'या' खेळाडूनं प्रपोज करण्यासाठी थेट ऑस्ट्रेलियाहून गाठलं इंग्लंड

मुंबई: कॅप्टन कूल धोनीचा सर्वात खास मित्र आणि जवळचा व्यक्ती सुरेश रैना. या दोघांच्या मैत्रीचे किस्से जगभरात प्रसिद्ध आहेत. गेल्या वर्षी सुरेश रैनानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास जाहीर केला. सध्या तो लिहित असलेल्या पुस्तकामुळे चर्चेत आहे. या पुस्तकात त्याने आपल्या करियरमधील अनेक किस्से चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. 

सुरेश रैनाची लव्हस्टोरी तर खूपच खास आहे. रैनाला प्रियांका खूप आवडली होती. तिला प्रपोज करण्यासाठी तो थेट ऑस्ट्रेलियाहून इंग्लंडला पोहोचला होता. ऑस्ट्रेलियाहून थेट इंग्लंडला जाण्यासाठी त्यावेळी कॅप्टन कूल धोनीनं देखील परवानगी दिली होती. सीरिजच्या मधल्या वेळेचा फायदा घेऊन रैनानं थेट इंग्लंड गाठलं आणि रिंग घेऊन प्रियांकाला प्रपोज केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suresh Raina (@sureshraina3)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना टीम इंडियाला त्यावेळी 8 दिवसांचा अवधी मिळाला होता. त्यावेळी रैनानं खास सुट्टी मागितली आणि कॅप्टन कूल धोनीनं त्यावेळी ती मंजूरही केली. रैना म्हणतो की, 'त्यावेळी मला माही भाईने खूप समजावलं होतं. ऑस्ट्रेलियातील सामन्याआधी केवळ प्रपोज करण्यासाठी इंग्लंडला का जातो. तिच्यापेक्षा अजून चांगली मुलगी भेटेल. त्यावेळी मी माझ्या निर्णयावर पक्का होतो. त्यामुळे मला माही भाईने सुट्टी दिली.' 

 

'माझ्याजवळ यूकेचा व्हिजा होता. मी बीसीसीआयकडून परवानगी घेतली. पहिला पर्थ ते दुबई 16 तास प्रवास केला. त्यानंतर दुबईहून थेट 12 तास प्रवास करून प्रियांकाला प्रपोज करण्यासाठी इंग्लंड गाठलं'

प्रियांका आणि सुरेश रैनानं 3 एप्रिल 2015 रोजी लग्नगाठ बांधली. प्रियांका चौधरी दिसायलाही खूप सुंदर आहे. बॉलिवूडमधील अभिनेत्रींएवढीच सुंदर दिसते. रैना आणि प्रियांका लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते.