भारताला मोठा धक्का! Vinesh Phogat ला रौप्य पदक नाहीच, क्रीडा लवादाने याचिका फेटाळली

CAS rejects Vinesh Phogat appeal : पॅरिस ऑलिम्पकमधून भारताला मोठा धक्का बसला आहे. क्रीडा लवादाने ऑलिम्पिक अपात्रतेच्या निर्णयानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटच्या रौप्य पदकाची याचिका फेटाळली आहे.

सौरभ तळेकर | Updated: Aug 14, 2024, 09:54 PM IST
भारताला मोठा धक्का! Vinesh Phogat ला रौप्य पदक नाहीच, क्रीडा लवादाने याचिका फेटाळली title=
CAS rejects Vinesh Phogat appeal

Vinesh Phogat silver medal Case : पॅरिस ऑलिम्पकमधून भारताला मोठा धक्का बसला आहे. क्रीडा लवादाने ऑलिम्पिक अपात्रतेच्या निर्णयानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटच्या रौप्य पदकाची याचिका फेटाळली आहे. विनेश फोगाटच्या याचिकेवर निर्णय होण्याची वाट प्रत्येक भारतीय पाहत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. विनेश फोगाट हीचं अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन जास्त असल्याचं स्पष्ट झाल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर विनेशनं क्रीडा लवादाकडं धाव घेतली होती. अशातच आता विनेश फोगाटसह भारतीयांची निराशा झाली आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) अध्यक्ष डॉ पीटी उषा यांनी कुस्तीपटू विनेश फोगटचा युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) विरुद्धचा अर्ज फेटाळण्याच्या कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (CAS) च्या लवादाच्या निर्णयावर धक्का आणि निराशा व्यक्त केली आहे. विनेशच्या पाठीशी उभे राहून, आम्ही विनेशचे म्हणणे ऐकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, कायदेशीर पर्याय शोधले जात आहेत, असं भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने म्हटलं आहे.

आत्तापर्यंत काय काय झालं?

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटने तिच्यावरील अपात्रतेच्या निर्णयावर क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. क्रीडा लवादाने कुस्तीपटू विनेश फोगाटची अपील स्वीकारली अन् तिचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर क्रिडा लवादाने हा निर्णय दिला आहे. तसेच जागतिक कुस्ती महासंघ आणि ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून आव्हान देण्यात येणार आहे, अशी माहिती देखील समोर होती.

विनेश फोगाटने याआधी क्रीडा लवादाकडे फायनल थांबवावी, अशी अपिल केली होती. मात्र, लवादाने स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर विनेशला रौप्य पदक देण्यात यावं, अशी विनंती लवादाकडे करण्यात आली. या विषयावर मत मांडण्यासाठी विनेशला अनुमती दिली होती. त्यामुळे विनेशला मोठा दिलासा मिळाला होता. 

विनेशच्या वतीनं दुसऱ्या याचिकेमध्ये रौप्य पदकाची मागणी करण्यात आली होती. ज्यावर CAS कडून या प्रकरणी विचारपूर्वक निर्णय देण्याचे संकेत देण्यात आले. ज्यानंतर लगेचच विनेशची बाजू मांडण्यासाठी वकीलांशी शोधाशोध सुरू झाली आणि हरीश साळवे यांच्यापाशी येऊन हा शोध संपला. हरीश साळवे यांनी आतापर्यंत अनेक कायदेशीर संघर्षांचा निकाल आपल्या बाजूनं अतिशय प्रभावीरित्या वळवण्याची किमया केल्यामुळं सर्वांच्या नजरा निर्णयावर होत्या. पण आता विनेशला मेडल घेऊन भारतात येता येणार नाही.