मुंबई : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची पत्नी आणि प्रसिद्ध डान्सर धनश्री वर्मा आपल्या डान्समुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या डान्सचे व्हिडिओ ती सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करते. तिच्या चाहत्यांना तिचा व्हिडिओ खूप आवडतो आणि धनाश्री वर्मा तिचा लेटेस्ट डान्स व्हिडिओ केव्हा पोस्ट करेल याची वाट पहात असतात. चहलची पत्नी धनश्रीने पुन्हा एकदा आपला डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. डान्सर धनश्रीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.
धनश्री वर्माने तिचा लेटेस्ट डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रवी सोनीसोबत नाचताना दिसत आहे. धनश्रीचा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 4 लाख वेळा पाहिला गेला आहे. आणि चाहत्यांच्या प्रतिक्रियाही यावर येत आहेत. धनश्री वर्माने तिचं एक वेगळं स्थान मिळवले आहे. कधी तिला म्युझिक व्हिडिओंमध्ये पाहिले जाते तर कधी ती क्रिकेटर्ससमवेत डान्सचे व्हिडिओ शेअर करते.
>
सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग
इन्स्टाग्रामवर चहलची पत्नी धनश्री वर्माला सुमारे 40 लाखाहून अधिक लोक फॉलो करतात. त्याच वेळी, यूट्यूबवर तिच्या सबस्क्रायबर्सची संख्या 25 लाखांपेक्षा अधिक आहे. धनश्री वर्माचे 'ओये होये होये' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. गाण्यात धनश्री आणि जस्सी गिलची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. धनश्री व्यवसायाने डॉक्टर आहे, पण नृत्याच्या माध्यमातूनही तिने आपली जबरदस्त ओळख निर्माण करण्यात कोणतीही कसर सोडली नाही.