फुटबॉल: चॅम्पियन्स लीगमध्ये नेमार जखमी, स्ट्रेचरवरून गेला मैदानाबाहेर

सेंट जर्मनचे स्टार खेळाडू नेमारच्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या रीयाल माद्रिद विरूद्धच्या चॅम्पीयन्स लीगमध्ये खेळण्यावर संदिग्धता निर्माण झाली आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 27, 2018, 02:26 PM IST
फुटबॉल: चॅम्पियन्स लीगमध्ये नेमार जखमी, स्ट्रेचरवरून गेला मैदानाबाहेर title=

पॅरिस : सेंट जर्मनचे स्टार खेळाडू नेमारच्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या रीयाल माद्रिद विरूद्धच्या चॅम्पीयन्स लीगमध्ये खेळण्यावर संदिग्धता निर्माण झाली आहे.

मार्सेल विरूद्ध विजय मिळवताना नेमारच्या पायाला रविवारी दुखापत झाली. दुखापत इतकी मोठी होती की, त्याला मैदानावरून बाहेर येणेही अशक्य झाले. अखेर त्याला स्ट्रेचरच्या सहाय्याने मैदानाबाहेर आणण्यात आले.  गेल्यावर्षी नेमारने  बार्सिलोनला सोडचिठ्ठी देत पीएसजी जॉनईन केले होते. त्यामुळे आता  ६ मार्चला होणाऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या सामन्यातील सहभागाबद्धलच दुखापतीमुळे मोठी संधिग्दता निर्माण झाली आहे.

पीएसजीच्या संघाला स्पेनमध्ये पहिल्या टप्प्यात १-३ असा पराभवाचा सामना करावा लागला. त्यातच नेमारला दुखापत झाल्यामुळे स्पोनला पीएसजीला दुहेरी झटका बसला आहे. दरम्यान, २६ वर्षीय नेमारला पुनरागमण करण्यासाठी आणखी किती वेळ लागेल याबाबत पीएसजीने कोणतेही स्पष्टीकर दिले नाही.