पुणे : हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये अंबाती रायडूचं शतक आणि शेन वॉटसनच्या अर्धशतकामुळे चेन्नईचा विजय झाला आहे. या विजयाबरोबरच चेन्नईनं प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारी चेन्नई ही दुसरी टीम ठरली आहे. याआधी हैदराबादनं प्ले ऑफमधलं त्यांचं स्थान निश्चित केलं होतं. प्ले ऑफमध्ये प्रवेश केल्याबरोबरच चेन्नईनं अनोखा विक्रम त्यांच्या नावावर केला आहे. आत्तापर्यंत खेळलेल्या सगळ्या हंगामामध्ये प्ले ऑफ किंवा सेमी फायनल गाठणारी चेन्नई ही एकमेव टीम आहे. आयपीएलच्या पहिल्या ८ मोसमानंतर चेन्नईवर २ वर्षांची बंदी घालण्यात आली. यानंतर या म्हणजेच ११व्या मोसमात चेन्नईनं आयपीएलमध्ये कमबॅक केलं. अशाप्रकारे ९ मोसमांमध्ये चेन्नई प्ले ऑफमध्ये क्वालिफाय झाली आहे. २०१० आणि २०११ साली चेन्नईनं आयपीएलचा किताब जिंकला आहे.
२००८- फायनलमध्ये राजस्थानकडून पराभव
२००९- सेमी फायनलमध्ये बंगळुरूकडून पराभव
२०१०- मुंबईविरुद्ध फायनलमध्ये विजय
२०११- बंगळुरूविरुद्ध फायनलमध्ये विजय
२०१२- फायनलमध्ये कोलकात्याकडून पराभव
२०१३- फायनलमध्ये मुंबईकडून पराभव
२०१४- सेमी फायनलमध्ये पंजाबकडून पराभव
२०१५- फायनलमध्ये मुंबईकडून पराभव
२०१६- निलंबन
२०१७- निलंबन
२०१८- प्ले ऑफमध्ये प्रवेश