'ते' गुपीत सांगण्यासाठी गेलने मागितले २ कोटी

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटपटू ख्रिस गेल आपल्या विजयावर भर घालण्याचा प्रयत्न करत आहे.

Updated: Nov 11, 2017, 10:26 AM IST
'ते' गुपीत सांगण्यासाठी गेलने मागितले २ कोटी title=

मुंबई : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज क्रिकेटपटू ख्रिस गेल आपल्या विजयावर भर घालण्याचा प्रयत्न करत आहे. गेलने एका मुलाखतीत म्हटलं की, मी सर्व गोष्टी सांगायला तयार आहे पण त्यासाठी मला भरपूर पैसे पाहिजे. गेलवर सिडनीच्या प्रसारमाध्यमांनी गेल्यावर्षी आरोप केला की तो एका महिले समोर नग्न झाला होता.

या प्रकरणात, न्यू साऊथ वेल्स सर्वोच्च न्यायालयाने बदनामीचा दावा गेल्या महिन्यात गेलच्या बाजूने दिला होता. यावर आता पुन्हा सुनावणी होणार आहे. परंतु गेलने आधीच आपली कथा विकण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी त्याने 3 लाख अमेरिकी डॉलर्स (सुमारे 2 कोटी) मागितले आहे.

गेलने ट्विटरवर ट्विट केले की, "माझाकडे सांगण्यासाठी एक छान कथा आहे. ही 60 मिनिटांची विशेष मुलाखत असू शकते किंवा लोकांना माझ्या पुढील पुस्तकासाठी प्रतीक्षा करावी लागेल. ही कथा न्यायालयात काय घडली आणि ऑस्ट्रेलियात पडद्या मागे काय काय घडले. मला कायद्याने बंदी घालण्यासाठी काय काय करण्यात आलं.' यामुळे आता पुन्हा एकदा गेल चर्चेत आला आहे.