दुबई : T20 वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजचा प्रवास संपलाय. शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला. ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्होचा शेवटचा सामना असल्याने वेस्ट इंडिजसाठी हा सामना खास होता. दोघांनी फलंदाजी दरम्यान मोठे शॉट्स खेळले. विशेष म्हणजे ख्रिस गेलला त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यातही एक विकेट मिळाली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित झाल्यावर ख्रिस गेल गोलंदाजीसाठी आला. ख्रिस गेलने त्याच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर मिशेल मार्चला बाद केलं. विशेष म्हणजे नंतर तो मिशेल मार्चला भेटायलाही गेला आणि त्याला मिठी दिला. ख्रिस गेलच्या शेवटच्या सामन्यावरही सस्पेंस आहे कारण त्याने सांगितले की तो अजूनही अर्ध-निवृत्त आहे.
Chris Gayle thanks Mitch Marsh for his final T20 International wicket #t20worldcup2021 pic.twitter.com/aGPKO8m8Si
— Steve Allen (@ScubaStv) November 6, 2021
याआधी ख्रिस गेलनेही त्याच्या ओव्हरमध्ये डेव्हिड वॉर्नरसोबत मस्ती केली होती. ख्रिस गेल गोलंदाजी करत असताना तो डेव्हिड वॉर्नरकडे पोहोचला आणि खिशात काहीतरी शोधू लागला. युनिव्हर्सल बॉस या नावाने प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलची शैलीही अशीच आहे, जिथे तो मैदानावरही मस्तीच्या मूडमध्ये दिसतो.
वेस्ट इंडिजचा हा या टी-20 विश्वचषकातील शेवटचा सामना होता, ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 157/7 धावा केल्या. ख्रिस गेलने चांगली सुरुवात केली, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अखेरीस किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो यांनी वेगवान धावा करत टीमची धावसंख्या वाढवली.