Gujarat Giants vs Bhilwara Kings : युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल गरब्यावर थिरकला, पाहा VIDEO

Gangnam style करणारा ख्रिस गेल जेव्हा गरबा खेळतो, VIDEO पाहिलात का तुम्ही?

Updated: Oct 3, 2022, 05:25 PM IST
 Gujarat Giants vs Bhilwara Kings : युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल गरब्यावर थिरकला, पाहा VIDEO  title=

मुंबई : देशभरात नवरात्री सण उत्साहात सुरु आहे. या उत्साहात वेस्ट इंडिजचा खेळाडू 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेल  (Chris Gayle) देखील न्हाहून निघाला आहे. ख्रिस गेलने नवरात्रीत जबरदस्त गरबा खेळला आहे. या गरब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

भारताचा महान क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) आणि वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) यांनी जोधपूरमध्ये नवरात्री साजरी केली आहे. या नवरात्रीच्या निमित्ताने ख्रिस गेलने जबरदस्त गरबा खेळला आहे.व्हिडिओत तुम्ही पाहू शकता त्याने भारतीय पोषाख परीधान केला आहे.

ख्रिस गेलने (Chris Gayle) लाल कलरचा कुर्ता आणि क्रिम कलरचा पायजमा घातला आहे. या पोषाखात तो तीन राजस्थानी तरूणींसोबत गरबा खेळताना दिसत आहेत. मैदानावर स्फोटक फलंदाजी करणारा खेळाडू इतका उत्कृष्ट नाचू शकतो, हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.  

गरबा खेळताना गेलचा (Chris Gayle)  हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून लिजेंड्स क्रिकेट लीग (Legends league cricket) गुजरात जायंट्सच्या त्याच्या फ्रेंचायझीने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.  दरम्यान याआधी आयपीएल सामन्या दरम्यान त्याने गंनगम स्टाईलवर देखील डान्स केला होता. या डान्सशी देखील खुप चर्चा होती. 

गुजरात जाएंटस विरूद्ध भिलवाडा किंग्सचा आज सामना 
लीजंड्स लीग क्रिकेट (Legends league cricket) अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. याआधी आज संध्याकाळी 7.30 वाजता गुजरात जाएंटस (Gujarat Giants) विरूद्ध भिलवाडा किंग्स (Bhilwara Kings) आमने सामने येणार आहेत.या सामन्यात जिंकणारा संघ इंडिया कॅपिटलशी शेवटचा फायनल सामना खेळणार आहे.