खेळाडू आपलं मेडल का चावतात? असं करण्यामागचं खरं कारण तुम्हाला माहितीय?

खेळाडू मेडल का चावतात? हे मेडल कोण बनवतं, तुम्हाला माहितीय?

Updated: Aug 8, 2022, 10:46 PM IST
खेळाडू आपलं मेडल का चावतात? असं करण्यामागचं खरं कारण तुम्हाला माहितीय? title=

मुंबई : सध्या बर्मिंगहॅममध्ये कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धां सुरु आहेत. ज्यामध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे. या मेडल्सची सुरुवात वेटलिफ्टिर मीराबाई चानूपासून सुरु झाली. तिने भारताला गोल्ड मिळवून दिला. ज्यानंतर भारताने चांगली सुरुवात केली आणि एकून 61 मेडल्स आपल्या नावे केले. भारताला कुस्तीमध्ये सर्वाधिक 12 मेडल मिळाले. तर वेटलिफ्टिंगमध्ये 10, टेबल टेनिसमध्ये 7,  बॉक्सिंगमध्ये 7, बॅडमिंटनमध्ये 6, ऍथलेटिक्समध्ये 8, लॉन बॉलमध्ये 2, पॅरा लिफ्टिंगमध्ये 1, ज्युडोमध्ये 3, हॉकीमध्ये 2, क्रिकेटमध्ये 1 आणि एक स्क्वॉशमध्ये 2 मेडल जिंकले.

खेळाडूंच्या या कामगिरीने भारतीय खूपच आनंदी आहेत. परंतु या मेडस संदर्भात अनेकांच्या मनात जिज्ञासा आहे की, हे मेडल खऱ्या धातूचे असतात का? म्हणजेच गोल्ड मेडल खरंच सोन्याचं असतं का? या मेडलचे वजन किती असतं? त्यात किती सोनं आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत.

मेडल किती ग्रॅमचे असते?

ऑलिम्पिक मेडल्स जरी 500 ग्रॅमची असली तरी सर्वाधिक वजन असलेले मेडल्स टोकियो ऑलिम्पिकमध्ये आहेत. यावेळी Gold मेडल सुमारे 556 ग्रॅम आहे, तर Silver मेडल्स 550 ग्रॅमची आहे आणि ते पूर्णपणे चांदीचे बनलेले आहे. त्याच वेळी, Bronze मेडल्स 450 ग्रॅमचे आहे, जे 95 टक्के तांबे आणि 5 टक्के जस्त यांचे मिश्रण करून बनवले जाते. हे मेडल्स अनेक गोष्टींचा पुनर्वापर करून बनवले जातात आणि त्यात सुमारे 92 टक्के शुद्ध चांदी असते, कारण ती काच, एक्स-रे प्लेट्स इत्यादींपासून बनवली जाते.

खरंच Gold मेडल सोन्याचं असतं का?

ऑलिम्पिकमधील कोणत्याही खेळातील सर्वोत्तम कामगिरीसाठीच Gold मेडल दिले जाते. जर आपण त्यातील सोन्याबद्दल बोललो, तर हे पदक पूर्णपणे सुवर्ण किंवा सोन्याचे नसते.  या Gold मेडलमध्ये फक्त सोन्याची थाळी असते, आणि तो पूर्णपणे चांदीचा बनलेला असतो. असे म्हटले जाते की, त्याच्या वजनाच्या 1% पेक्षा थोडे जास्त त्यात सोनं असतं, त्यामुळे यामध्ये जवळजवळ 6 ग्रॅम सोनं आहे असे आपण म्हणू शकतो. Olympics.com च्या मते, त्यात 6 ग्रॅमपेक्षा थोडे जास्त सोने आहे.

मेडल कोण बनवतं?

यजमान शहराची आयोजक समिती मेडलच्या रचनेसाठी जबाबदारी घेते आणि हे खेळानुसार बदलू शकते. ही मेडल्स विशेषतः डिझाइन केलेले असतात आणि खेळाडूंना पदकासह रिबन देखील देण्यात येते.

खेळाडू मेडल का चावतात?

ऑलिम्पिक इतिहासकारांच्या आंतरराष्ट्रीय सोसायटीचे अध्यक्ष डेव्हिड व्हॅलेकिन्स्की यांनी 'द कम्पलीट बुक ऑफ द ओलंपिक्स' या पुस्तकातून या खेळासंदर्भात बऱ्याच गोष्टींची माहिती दिली आहे.

तसेच त्यांनी खेळाडू मेडल का चावतात? याबाबत सीएनएनशी बोलताना  सांगितले की, हे फोटोग्राफर्समुळे होते. ते म्हणाले, ''मला वाटते की क्रीडा पत्रकार हे एक आयकॉनिक फोटो म्हणून त्याच्याकडे पाहतात, त्यांना त्यांचे फोटो काहीहीतरी हॅपनिंग हवे असतात, ज्याचा ते सेल करु शकतील. त्यामुळे त्यांनी ही पोज तयार केली आहे. ज्यामुळे फक्त एक पोज म्हणून खेळाडू हे मेडल चावतात. त्याव्यतिरीक्त महत्त्वाचं कोणतंही कारण नाही.''