भारताविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, कर्णधार कमिंससह 'या' खेळाडूंचं पुनरागमन

एशिया कप स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिन संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार पॅट कमिंससह महत्वाच्या खेळाडूंनी संघात पुनरागमन केलंय.

राजीव कासले | Updated: Sep 17, 2023, 07:50 PM IST
भारताविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, कर्णधार कमिंससह 'या' खेळाडूंचं पुनरागमन title=

Australia Squad For ODI Series: एशिया कपमधल्या शानदार विजयानंतर भारतीय संघ (Team India) आता मायदेशात ऑस्ट्रेलियाला (Australia) भिडणार आहे. भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची (Australia Squad) घोषणा  करण्यात आली आहे. 18 खेळाडूंच्या ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदाची धुरा पॅट कमिंसकडे (Pat Cummins) सोपवण्या आली आहे. दुखापतीमुळे कमिंस दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर होता. ऑस्ट्रेलियन संघातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे हुकमी फलंदाज ट्रेविस हेडला या संघात संधी देण्यात आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ट्रेविस हेडच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाला होता. हेडच्या जागी संघात मॅथ्यू शॉर्टला ऑस्ट्रेलियन संघात जागा मिळालीय. 

या खेळाडूंचं पुनरागम
ऑस्ट्रेलियन संघात ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्ह स्मिथ आणि मिचेल स्टार्क या खेळाडूंचंही पुनरागमन झालं आहे. दुखापतीमुळे हे तीनही खेळाडू संघाबाहेर होते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यालाही त्यांना मुकावं लागलं होतं. टीम लाबूशेनलाही संघात स्थान देण्यता आलं होतं. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात लाबूशेनने जबरदस्त कामगिरी केली होती. तर अष्टपैलू खेळाडू एश्टन एगर कौटुंबिक कारणामुळे भारत दौऱ्यावर येणार नाही. 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी एक सामना जिंकलाय. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच धुलाई  केली होती.

22 सप्टेंबरपासून मालिका
भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला एकदिवसीय सामना 22 सप्टेंबरला मोहालीत खेळवला जाणार आहे. दुसरा सामना 24 सप्टेंबरला इंदोरमध्ये तर मालिकेतला तिसरा एकदिवसीय सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ थेट एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्धच खेळणार आहे. 8 ऑक्टोबरला चेन्नईवर हो दोनही संघ आमने सामने येतील. 

एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ : पॅट कमिंस (कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरुन ग्रीन, जोश हेजलवुड, जोश इंग्लिस, स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जाम्पा.

भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना - 22 सप्टेंबर - मोहाली
दूसरा एकदिवसीय सामना - 24 सप्टेंबर - इंदौर
तिसरा एकदिवसीय सामना - 27 सप्टेंबर - राजकोट